High Blood Pressure: थंडीत ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी या भाज्यांचा करा आहारात समावेश

उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटोच्या रसाचे सेवन केले जाऊ शकते.

High Blood Pressure: थंडीत ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी या भाज्यांचा करा आहारात समावेश
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 6:02 PM

नवी दिल्ली – उच्च रक्तदाब (high blood pressure) ही आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. खराब दिनचर्या, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त आराम करणे आणि तणावामुळे (stress, bad lifestyle) ही समस्या उद्भवते. तसेच शरीरात सोडिअमच्या असंतुलनामुळेही उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा (heart attack) धोका वाढतो. यासाठी उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हालाही उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवायचे असेल तर या भाज्यांचा (vegetables)आहारात आवर्जून समावेश करा

टोमॅटो

वाढत्या उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटोच्या रसाचे सेवन केले जाऊ शकते. मात्र, रसात मीठ घालू नये. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात आढळते. पोटॅशिअम शरीरातील सोडिअम संतुलित करते. यासाठी रोज टोमॅटोचा रस प्यावा.

हे सुद्धा वाचा

पालक

हिवाळ्यात पालक सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. ल्युटीन, पोटॅशिअम, फायबर, फोलेट आणि व्हिटॅमिन-ई हे आवश्यक पोषक घटक पालकामध्ये आढळतात, जे विविध प्रकारच्या आजारांवर फायदेशीर असतात. विशेषतः पोटॅशिअम हे उच्च रक्तदाबाच्या समस्येसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी हिवाळ्यात पालकाचे नक्की सेवन करावे.

गाजर

वाढता उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर आहारात गाजराचा समावेश करावा. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात असे अनेक आवश्यक पोषक घटक गाजरात आढळतात. यासाठी हिवाळ्यात गाजर सॅलड, कोशिंबीर किंवा गाजर हलवा या स्वरूपात सेवन करू शकता.

बीन्स

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तुम्ही आहारात बीन्सचा समावेश करू शकता. यामध्ये फायबर, कॅल्शिअम, लोह, प्रोटीन, पोटॅशिअम आणि ए, सी, के आणि बी6 ही जीवनसत्व आढळतात, जे उच्च रक्तदाबासह इतर अनेक आजारांवर फायदेशीर आहेत.

ब्रोकोली

ब्रोकोली ही आपल्या आरोग्यासाठी एक वरदान आहे. यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी असणारे सेलेनिअम आणि ग्लुकोसिनोलेट हे घटक ब्रोकोलीमध्ये आढळतात. याशिवाय ब्रोकोलीमध्ये पोटॅशिअमही असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही ब्रोकोलीचा आहारात समावेश करू शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.