बाथरूममध्येच सर्वाधिक हार्ट अटॅक का येतात?, एक छोटीशी चूक महागात पडेल; ही कारणं तुम्हाला ही माहीत हवीच…

हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चुकीची जीवनशैली आणि ताणतणाव हे प्रमुख कारणे असली तरी, थंड पाण्याने चुकीच्या पद्धतीने अंघोळ करणे ही देखील एक कारण असल्याचे समोर आले आहे. थंड पाणी थेट डोक्यावर टाकल्याने रक्तदाब अचानक वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. योग्य पद्धतीने अंघोळ करून हा धोका कमी करता येतो.

बाथरूममध्येच सर्वाधिक हार्ट अटॅक का येतात?, एक छोटीशी चूक महागात पडेल; ही कारणं तुम्हाला ही माहीत हवीच...
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 3:43 PM

सध्या हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. चिंतेची बाब म्हणजे कोणत्याही वयातील लोकांना ही समस्या जाणवत आहे. त्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. चुकीची जीवनशैली, वाढते ताणतणाव, वेळेवर न जेवणे, चुकीचा आहार, फास्टफूडकडे वाढलेला ओढा, धावपळ आणि दगदग यामुळे हृदयविकाराच्या घटना वाढत आहेत. त्याबाबत सावत राहण्याचा डॉक्टर सल्ला देतच असतात. पण चुकीच्या अंघोळ करण्याच्या पद्धतीमुळेही हृदयविकाराचे प्रकार वाढत असल्याचं समोर आल्याने अधिकच चिंता व्यक्त केली जात आहे. बाथरूममध्येच सर्वाधिक हार्ट अटॅक येण्यामुळेही काळजी वाढली आहे. संशोधनातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

हृदयविकाराचा झटका का येतो?

हार्ट अटॅक येणे म्हणजे हृदयाचे कार्य थांबणे. या स्थितीत शरीरातील महत्त्वाचे अवयव ऑक्सिजनयुक्त रक्त प्राप्त करू शकत नाहीत. ऑक्सिजन युक्त रक्त न मिळणं आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. काही लोक हृदयविकाराच्या झटक्याला हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि हृदयविफलता हे शब्द एकसारखे वापरतात. या शब्दातून एकच गोष्ट दर्शवत असली तरी त्याचे प्रकार वेगवेगळे असतात, मात्र त्यांचा परस्पर संबंध असतो.

अंघोळीवेळी हृदयविकाराचा धोका कसा वाढतो?

अंघोळ करत असताना योग्य पद्धतीने अंघोळ केली नाही तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. विशेषतः ज्यांना हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांच्यासाठी हा धोका जास्त असतो. सामान्य लोकांनाही या समस्येचा धोका नाही असे नाही. आता प्रश्न आहे की, चुकीच्या स्नानाची पद्धत काय आहे?

हे सुद्धा वाचा

चुकीच्या स्नानामुळे हृदयविकार

सामान्यतः थंड पाण्याने स्नान केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. विशेषतः, तळहात आणि पायांवर थंड पाणी लागल्यानंतर त्वरित थंड पाणी डोक्यावर टाकल्याने रक्तदाब अचानक वाढतो. या कारणामुळे रक्ताभिसरणात अडथळा येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

स्नान करण्याची योग्य पद्धत

स्नान करताना, थंड पाणी थोड्या थोड्या प्रमाणात अंगावर टाकावे.

सर्वप्रथम पायांवर पाणी टाकून अंगोळीला सुरुवात करा. यामुळे शरीराला पाण्याच्या तापमानाची जाणीव होईल आणि शरीर शॉक होणार नाही.

पायांनंतर हळूहळू शरीराच्या वरच्या भागावर पाणी घाला. शेवटीच डोक्यावर पाणी टाका.

तसेच, बकेट किंवा मगचा वापर करणे चांगले. थंड पाणी थेट डोक्यावर टाकणे टाळा. कारण ते मेंदूला धक्का बसू शकतो आणि रक्तदाबात अचानक वाढ होऊ शकते.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.