Women’s Day 2023 : पुरुषांच्या तुलनेत महिलांना असतो या आजाराचा असतो जास्त धोका
8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांना केवळ त्यांचे अधिकार आणि कर्तव्यांबद्दलच नव्हे तर त्यांच्या आरोग्याबद्दल देखील जागृत करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. महिलांमध्ये होणाऱ्या काही सामान्य आजारांबद्दल जाणून घेऊया.
नवी दिल्ली : बऱ्याच वेळेस व्यस्त असल्यामुळे (busy schedule) तर कधी निष्काळजीपणामुळे महिलांचे त्यांच्या आरोग्याशी (health) संबंधित अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होते. मात्र या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकतात. आज 8 मार्च, आजच्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ (International Women’s Day 2023) साजरा करण्यात येतो. महिलांना केवळ त्यांचे अधिकार आणि कर्तव्यांबद्दलच नव्हे तर त्यांच्या आरोग्याबद्दल देखील जागृत करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे.
आज महिला दिनानिमित्त आपण अशाच काही आजारांविषयी जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल केवळ महिलांना केवळ माहिती असणेच आवश्यक नाही तर त्यासंदर्भातील आवश्यक चाचण्याही वेळोवेळी करणे महत्वाचे ठरते. त्यामुळे उद्भवणाऱ्या या आजारांवर वेळीच उपचार करता येतात. त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक आयुष्यासाठी भारी पडू शकते.
व्हजायनल इन्फेक्शन
महिलांमध्ये जिवाणूजन्य योनिमार्गाचे संक्रमण अथवा इन्फेक्शन हे खूप सामान्य आहे. जरी हे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकत असले तरी 15 ते 44 वर्षांच्या स्त्रियांमध्ये सामान्यतः दिसून येते. योनीमार्गाच्या संसर्गाला किरकोळ समजण्याची चूक करू नका कारण वेळीच उपचार न केल्यास ते गंभीर स्वरूप धारण करू शकते.
मधुमेह
महिलांच्या आरोग्याशी निगडीत दुसरी कॉमन समस्या म्हणजे मधुमेह. ज्याचे मुख्य कारण आहार तसेच हार्मोनल असंतुलन आहे. बैठी जीवनशैली, आहारातील गडबड आणि शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता हेदेखील मधुमेहासाठी कारणीभूत ठरते. मधुमेहाच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवू शकतात, त्यामुळे त्याच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये.
हायपरटेन्शन
हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब. याचा तणावाशी थेट संबंध येतो. रजोनिवृत्तीच्या काळात अथवा त्या स्थितीत उच्च रक्तदाबाची शक्यता आणखी वाढते. त्यामुळे जर एखाद्या महिलेला उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत असेल तर त्यासंदर्भात नियमित तपासणी करून घ्यावी.
पीसीओएस
महिलांमध्ये हार्मोन्सची पातळी बिघडली तर पीसीओएसची (Polycystic ovary syndrome) समस्या वाढू शकते. त्यामुळे ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही. पण महिलांनी त्यांची जीवनशैली आणि आहारात आवश्यक व योग्य ते बदल केल्यास ही समस्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकते अथवा बरी होऊ शकते.
ॲनिमिया
ॲनिमिया हा महिलांमध्ये होणारा सर्वात गंभीर आजार आहे, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. शरीरात लोहाची कमतरता असणे हे अशक्तपणाचे मुख्य कारण असते. मासिक पाळी दीर्घकाळ राहिल्यास रक्त कमी होऊ शकते. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष न करत त्याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ते उपचार करणे, आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.