kids’ growth: बाळाचे पोट भरले की नाही, कसे समजावे ? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

लहान मुलांचा विकास चांगला व्हावा यासाठी त्यांना केवळ दूध पाजणे पुरेसे नाही. त्यांचे पोट नीट भरले की नाही, हेही तुम्हाला तपासावे लागेल.

kids' growth: बाळाचे पोट भरले की नाही, कसे समजावे ? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला
Small babiesImage Credit source: google
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 12:31 PM

लहान मुलांचे (Small babies) पालन-पोषण करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. मुलांचा योग्य विकास (kids’ growth) होण्यासाठी त्यांचा आहार हा महत्वाचा मुद्दा आहे. मुलांचे पोट नीट भरले आहे किंवा नाही, हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. लहान मुलं बोलू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना काय हवे हे नीट सांगता येत नाही. त्यांना पुरेसे दूध (milk) मिळत आहे की नाही, याचा अंदाज काही लक्षणे अथवा चिन्हांवरून तुम्हाला लावावा लागतो. नवजात बालके सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध सेवन करतात. त्यानंतर त्यांना हळूहळू घन पदार्थही देता येतात. दूध पिऊन बाळाच पोट बरले आहे की नाही हे समजण्यासाठी काही लक्षणांकडे नीट लक्ष द्यायला हवे, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. या विषयावर सविस्तर माहिती मिळावी यासाठी लखनऊमधील झलकारीबाई रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपा शर्मा यांच्याशी संवाद साधला. त्यांनी महत्वाची माहिती दिली.

1) चिडचिड –

बाळाला भूक लागली असेल, तर त्याची चिडचिड होऊ लागते. तसेच त्यांचे डायपर जास्त ओले झाले नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की बाळ नीट दूध पित नाहीये.

2) सुस्त राहणे –

दूध पिऊन झाल्यावर पोट नीट भरले असेल तर बाळ चांगले खेळते, ॲक्टिव्ह राहते. मात्र ते सुस्त असेल तर समजावे की त्याचे पोट नीट भरलेले नाही. मुलांच्या लघवीचा रंग जास्त पिवळा असल्यास मुलांना पुरेसं दूध मिळत नाही, असा अर्थ होतो.

हे सुद्धा वाचा

3) तोंड कोरडे पडणे-

लहान मुलांचे डोळे आणि तोंड कोरड वाटत असेल तर ते डिहायड्रेशनचे लक्षण असते. याचाच अर्थ असा की, बाळ पोटभर दूध पित नाहीये.

4) दूध पिऊन झोपणे –

लहान मुलं किती वेळ दूध पितात, याचा त्यांच्या पोट भरण्याशी काहीही संबंध नसतो. बाळ दूध पिणं बंद करेल व त्याला थोडी झोप लागत असेल, तर त्याचे पोट भरले असे समजावे.

5) दूध गिळणे –

स्तनपान करता बाळाच्या दूध गिळण्याचा आवाज येत असेल तर समजावे की ते नीट दूध पित आहे. बाळाने दूध प्यायल्यानंतर तुम्हाला स्तन हलके वाटू लागतील.

6) वजन वाढणे –

जर मुलांचे वजन वाढत असेल, त्यांचा विकास नीट होत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. याचाच अर्थ असा की बाळाचे पोट नीट भरत आहे आणि ते व्यवस्थित दूध पीत आहे.

लहान बाळांचा आहार –

– जन्मापासून 2 महिन्यांपर्यंत नवजात मुलं रोज 8 ते 12 वेळा दूध पितात. – म्हणजेच दर 2 ते 3 तासांनी मुलांना दूध हवे असते. – 2 महिन्यांचे झाल्यानंतर लहान मुलं 3 ते 4 तासाने दूध पितात. – चौथ्या महिन्यात मुलं 5-6 तासांनी दूध पितात. – सहाव्या महिन्यात मुलं दर 6 ते 8 तासांनी दूध पितात. 6 महिन्यानंतर मुलांना अन्नपदार्थही देण्यास सुरूवात केली जाते. मुलांचा आहार बदलतो. – मुलांना भूक लागल्याचे काही लक्षण दिसत नसेल तरी त्यांना वेळोवळी दूध पाजले पाहिजे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.