Weight Loss : ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

आजकाल बऱ्याच जणांना जाडेपणाची समस्या सतावत असते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात.

Weight Loss : ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
ब्लॅक कॉफी, प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 1:57 PM

Weight Loss Tips : शरीरावर वाढलेली चरबी, फॅट आणि पुढे आलेलं पोट, कोणालाच आवडत नाही. वाढलेले वजन, लठ्ठपणा (Obesity) हे अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते. मात्र आजकालचे वेगवान जीवन, व्यस्त जीवनशैली यामुळे अनेक लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. असे लोक वजन कमी करण्यासाठी (Weight loss) बरेच प्रयत्न करतात. लठ्ठपणाचा त्रास सहन करावे लागणाऱ्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी व्यायाम, योगासने आणि अनेक प्रकारचे डाएट करतात. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र सर्वजण त्यात यशस्वी होताात असे नाही. काहींना वजन कमी करण्यात यश मिळते. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का, की वजन कमी करण्याची सुरुवात तुम्ही कॉफी पिऊन करू शकता. रोज ब्लॅक कॉफी (Black coffee) पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता तसेच वाढलेले पोटही नियंत्रणात ठेवू शकता.

ब्लॅक कॉफीमुळे वजन कमी कसे होते, हे जाणून घेऊ….

  1. ब्लॅक कॉफीमध्ये पुरेशा प्रमाणात क्लोरोजेनिक अॅसिड नावाचे तत्व असते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म वेगाने वाढते. त्याशिवाय कॉफीमध्ये ॲंटी- ओबेसिटी गुणधर्म असतात, जे शरीरातील चरबी घटवण्यास मदत करतात.
  2. ब्लॅक कॉफीमध्ये अशी अनेक तत्वे असतात, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्या लोकांना दिवसभरात अनेक वेळा खाण्याची क्रेव्हिंग (तीव्र इच्छा) होते, त्यांनी ब्लॅक कॉफी प्यायल्यास वारंवार लागणाऱ्या भूकेपासून मुक्ती मिळते.
  3. दूध घालून केलेल्या कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफीमध्ये कॅफेन, थियोब्रोमाइन, थियोफाइलिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड जास्त प्रमाणात असते. या सर्व घटकांमुळे शरीरावरील चरबी वेगाने कमी होते.
  4. योगासने किंवा व्यायाम करण्यापूर्वी ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यास, एनर्जी लेव्हल वाढते. त्यामुळे तुम्ही जास्त व्यायाम करू शकता, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

वजन कमी होण्यासाठी कशी प्यावी ब्लॅक कॉफी?

ज्यामध्ये दूध किंवा साखर काहीही घातलेले नसते, ती असते ब्लॅक कॉफी. एका भांड्यात 1 ते दीड कप पाणी घ्यावे. त्यामध्ये 1 चमचा कॉफी पावडर घालावी. त्याला उकळी येऊ द्यावी. तुमची ब्लॅक कॉफी तयार होईल. तुम्हाला ब्लॅक कॉफीची चव खूप कडू वाटल्यास तुम्ही त्यामध्ये थोड कोको पावडर आणि दालचिनी मिसळू शकता. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा आणि कॉफी गाळून घ्यावी. तिचे सेवन करावे.

हे सुद्धा वाचा

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो. जे लोक व्यायाम करतात, केवळ त्यांनीच सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यावी. व्यायाम केल्याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्यास पोट खराब होणे, अॅसिड रिफ्लेक्स असे त्रास होऊ शकतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.