थंडीत गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले की वाईट ?
थंडीत आंघोळ करताना थंड पाण्याने आंघोळ करणे योग्य की गरम पाण्याने आंघोळ करणे योग्य असते. काही जण थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करत असतात. तर काही जण उन्हाळ्यात देखील गरम पाण्याने आंघोळ करत असतात. चला तर पाहूया गरम पाण्याने आंघोळ करणे योग्य की अयोग्य ?
थंडीत आता चांगलीच जाणवू लागली आहे. तापमान घटल्याने आपल सर्वसाधारणपणे गरम पाण्याने आंघोळ करायला राजी होतो. गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला ताजेपणा वाटतो.परंतू खरेच गरम पाण्याने आंघोळ करणे फायद्याचे आहे की यामुळे आपल्या शरीराला काही नुकसान देखील होऊ शकते. चला तर पाहूयात थंडीत गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि तोटे नेमके काय आहेत.
थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला चांगला शेक मिळतो आणि ताण तणाव कमी होऊन शांती लाभते. गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील थकवा दूर होतो. आणि मेंदूचा ताण कमी होऊन आराम मिळलो. जे लोक मानसिक तणाव आणि तणावपूर्ण कामे करतात त्यांनी गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू मोकळे होतात. ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तसंचार चांगला वाढतो. शरीरातील सर्व भागाला रक्तपुरवठा नीट होतो. ज्यामुळे शरीराच्या पेशींपर्यंत आणि अवयवापर्यंत ऑक्सीजन पोहाचतो. खासकरुन थंडीत शरीरात थंड भागाला गरम राखण्यास मदत होते.
स्नायूतील दुखण्यात आराम –
जर स्नायूंना दुखापत झाली असेल किंवा स्नायू आखडले असतील तर गरम पाण्याने आंघोळ करणे हा एक चांगला उपाय ठरु शकतो.एक प्रकारे थंडीत गरम पाणी अंगावर घेतल्याने स्पा ट्रीटमेंट सारखा आराम मिळतो. स्नायू मोकळे होतात. गरम पाण्याने जर तुम्ही आंघोळ करीत असाल तर तुमच्या त्वचेला देखील आराम मिळतो.जर तुम्ही थंडीतून आलात तर शरीराच्या तणावग्रस्त त्वचेला नरम करण्यास गरम पाणी मदत करते. तसेच गरम पाण्याचे त्वचेची रंध्रे खुली होतात. त्यामुळे त्वचेची स्वच्छता होते आणि घाण सगळी बाहेर पडते.
गरम पाण्याने अंघोळीचे दुष्परिणाम
थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने अनेक तोटे देखील आहेत. जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे त्वचेसाठी हानिकारक असते. अत्यंत गरम पाण्याने त्वचेचा नरमपणा कमी होतो. ज्यामुळे त्वचा कोरडी होते. या कारणाने त्वचा तडतडते आणि खाज सुटु शकते. तसेच त्वचेत चिरा देखील पडतात. म्हणून तुमची त्वचा नाजूक असेल तर गरम पाण्याचा दुष्परिणाम होतो. त्वचेचा नरमपणा कायम राखण्यासाठी योग्य मॉईश्चराईजरचा वापर जरुर करावा.
सोरायसिसची समस्या
गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेची वरचा स्तराला नुकसान होते. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर अधिक गरम पाण्याने त्वचा लालसर होते. खाज सुटू शकते. त्यामुळे अलर्जी होऊ शकते. त्यामुळे त्वचेची स्थिती बिघडू शकते. त्यामुळे एक्झिमा आणि सोसायसिस सारख्या समस्या वाढू शकते.
मॉइस्चराइजर लावावे
थंडीत आंघोळ करताना पाण्याचे तापमान जास्त गरम किंवा अधिक थंड नसावे. कोमट पाण्याने आंघोळ करणे सर्वात चांगले. जर पाणी खूपच गरम असेल तर आपल्या शरीराच्या अनुकूल तापमान आणावे. जर गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर अधिक काळ गरम पाण्याखाली राहू नका. कारण अधिक गरम पाण्याने त्वचा रुक्ष होते. त्यामुळे जर त्वचेला आंघोळीनंतर चांगले मॉइस्चराइजर लावावे. त्यामुळे तुमची त्वचा नरम होऊ शकते.