पावसाळ्यात अंगाला सुटतेय खाज, या घरगुती उपायांनी मिळेल त्वरित आराम
पावसाळ्यात बॅक्टेरियाचे संक्रमण खूप पटकन होत असते. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेला खूप खाज येत असते. ही खाज रोखण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूयात....
पावसाळ्यात कोंदट वातावरण आणि त्वचा ओली रहात असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे अंगाला या दिवसात सारखी खाज येत असते. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना किंवा मैत्रिणी समोर आपले इम्प्रेशन नक्कीच डाऊन होते. त्यामुळे त्वचेच्या खाजेवर तातडीने उपाय करायला हवा. खाजेचा त्रास आपल्याला अनेक कारणांनी होत असतो. एलर्जी, किटकाचा दंश, रुक्ष त्वचा, त्वचा कोरडेपणा यामुळे आपल्या त्वचेला खाज येत असते. आज आपण पाहूया खाजेसाठी घरगुती उपाय काय आहेत.
1. थंड पाण्याने आंघोळ करणे
का ? : थंड पाण्याने त्वचा शांत होते. आणि खाज कमी होते.
कशी करावी : दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी
2. ओट्सची पेस्ट:
का ?: ओट्समध्ये त्वचेवरील सूज कमी करणारे घटक असतात
कशी करावी : ओट्सला वाटून पेस्ट तयार करावी आणि ती खाज येणाऱ्या जागेवर लावावी. काही वेळानंतर थंड पाण्याने धुवावे.
3. एलोव्हेरा जेल:
का ? : एलोव्हेरामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी आणि थंडत्वाचे गुण असतात
कशी करावी : एलोव्हेरा जेल आपण खाज येणाऱ्या जागेवर लावावी.
4. बेकिंग सोडा:
का ? : बेकिंग सोडा खाज आणि त्वचेचा दाह कमी करते.
कशी करावी : बेकिंग सोड्यात पाणी पेस्ट बनवून आणि परंतू खाज येणाऱ्या जागी लावाली.
5. तुलसीची पाने :
का ? : तुलसी एंटीसेप्टीक गुणामुळे संक्रमण रोखता येत होते कशी करावी : तुलसीच्या पानांनी पेस्ट बनवावी आणि याचा वापर खाजेवर लावावे.
6. कडूनिंबाचे पाने :
का : कडूनिंबाचे एंटीबॅक्टीरियल आणि एंटीफंगल गुण असते
कशी करावी : कडूनिंबाची पानांना वाटून पेस्ट बनवून खाजेच्या जागी लावावी
7. काकडी :
का: काकडीचा गुणधर्म थंड असल्याने आणि सूज कमी होते
कशी करावी : काकडीचे स्लाईस बनवून खाज येणाऱ्या जागेवर लावावी
8. सुती कपडे :
का : सूती कपडे परिधान केल्याने त्वचा श्वास घेते त्यामुळे खाज येत नाही
कशी करावी : रेशमी किंवा लोकरीच्या कापडाने खाज येण्याची शक्यता जास्त असते.
9. एलर्जीपासून सुटका कशी करावी ?
का : एलर्जीमुळे एलर्जन्सपासून दूर रहावे
कशी करावी : धूळ, परागकण, आणि अन्य एलर्जन्स दूर राहावे
अन्य उपाय :
हायड्रेटेड रहावे –
पोषक आहार घ्यावा –
ताण आणि तनाव कमी करावा –
( जर खूप जास्त खाज असेल किंवा ताप, सूज आली असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा, खाजेच्या जागी जास्त खाजवू नये. हे घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )