निरोगी आरोग्यासाठी योग करताना ‘या’ विशेष गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर…..
योगा करणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. योगा केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. दररोज सकाळी नियमित योगा केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळते. शरीराला योग्य ऑक्सिजन मिळाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
नव्या वर्षांला सुरुवात झाली आहे. नव्या वर्षातच्या पहिल्याचं दिवसापासून अनेकांनी निरोगी आरोग्यासाठी विशेष संकल्प घेतात. अनेकजण जिम जॉईन करतात तर काहीजण घरच्या घरी योगा करण्यास सुरुवात करतात. योगा केल्यामुळे तुमच्या शरीराची लवचिरकता वाढते आणि तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. योगा केल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. तुमच्या आरोग्याकडे लक्ष नाही दिल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता आहे.
योगा केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वतळते, त्यासोबतच तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. अनेकजण दररोज सकाळी उठल्यावर योगा करतात. परंतु योगा करताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. तुम्ही जर या चुका केल्या तर त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया योगा करताना काय काळजी घ्यावी.
रिकाम्या पोटी योगा करणे गरजेचे आहे. योगा करण्यापूर्वी किमान अर्धा ते एक तास पाणी प्यावे किंवा पोट रिकामे करण्यासाठी पोट रिकामे करण्यासाठी फ्रेश व्हा. जर तुम्ही संध्याकाळी योगा करत असाल तर जेवल्याननंतर किमान ३ ते ४ तासांनंतर योगा करणे गरजेचे आहे. योगा केल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होतो.
योगासने केल्यानंतर तुमची योगा मॅट योग्य जागी ठेवावीत. त्याचे कारण म्हणजे योगा मॅट आरामदायी नसेल तर योगा करताना अधिक त्रास होऊ शकतो. तुमची योगा मॅट नेहमी मऊ आणि आरामदायी असावी. तुमची मॅट जास्त प्रमाणात सरकणारी नसली पाहिजेल. योगा मॅट घसरल्यामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. तसेच तुमच्या योगा मॅटच्या स्वच्छतेची योग्य काळजी घ्यावी. योगा करताना योग्य कपडे घालणे महत्त्वाचे आहे. योगा करताना तुमच्या शरीराला आरामदायक कपडे निवडणं गरजेचे आहे. कारण योगा करताना मऊ कपडे घातले नाही तर तुम्हाला योगा करताना अस्वस्थ वाटू शकते आणि तुम्हाला नीट श्वास घेता येत नाही. त्यामुळे योगा करताना हवामानुसार कपडे निवडणं गरजेचे आहे.
योगा करताना योग्य मुद्रा करणे गरजेचे आहे. योगा करताना तुम्ही जर चुकिच्या मुद्रा केल्या तर तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते. कोणत्या व्यक्तीने कोणता आसन करावा हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. तसेच जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे दुखापत असेल किंवा आजार असेल तर तुम्ही हलके आणि सोपे योगासने करणे गरजेचे आहे. तुम्ही योगा करताना निसर्गाच्या सानित्यामध्ये केले तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो. ताज्या हवेत योगा केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. योगा केल्यामुळे तुमच्या शरीराला ऑक्सिजन मिळते.