Sweating | अति घाम येतोय? उन्हाळा समजून दुर्लक्ष करू नका, असू शकते अनेक गंभीर आजारांचे लक्षण!

जास्त प्रमाणात घाम येण्याच्या या समस्येस सामान्य समजू नका. कारण, जास्त घाम येणे देखील काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. वैद्यकीय भाषेत अत्यधिक घाम येण्याच्या या समस्येस ‘हायपरहायड्रोसिस’ म्हणतात.

Sweating | अति घाम येतोय? उन्हाळा समजून दुर्लक्ष करू नका, असू शकते अनेक गंभीर आजारांचे लक्षण!
घाम येण्याची समस्या
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 3:17 PM

मुंबई : तुम्हीही अशाच लोकांपैकी आहात का, ज्यांना खूप घाम फुटतो? ट्रेडमिल वर्कआऊटच्या केवळ 5 मिनिटांनंतर आपल्याला घाम येऊ लागतो? एखाद्याला हातमिळवणी करताना आपल्याला आपले तळवे पुसून घ्यावे लागतात? जर, या सर्व प्रश्नांसाठी तुमची उत्तरे होय असतील, तर जास्त प्रमाणात घाम येण्याच्या या समस्येस सामान्य समजू नका. कारण, जास्त घाम येणे देखील काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. वैद्यकीय भाषेत अत्यधिक घाम येण्याच्या या समस्येस ‘हायपरहायड्रोसिस’ म्हणतात(Know about excessive sweating it can be a symptom of these diseases).

कोणत्याही कारणाशिवाय घाम येणे होते सुरू

अमेरिकन अकादमी ऑफ डर्मॅटोलॉजीशी संबंधित त्वचारोगतज्ज्ञ बेंजामिन बार्नकिन म्हणतात, ‘बहुतेक प्रसंगी लोकांना सामान्यपणे घाम फुटत आहे की, काही वेगळ्या कारणामुळे किंवा आजारामुळे ते ओळखणे कठीण आहे. घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण गरम वातावरणात असाल, शारीरिक क्रियाकलाप करत असाल, ताणतणाव किंवा राग येत असेल, तेव्हा घाम येणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. परंतु, हायपरहाइड्रोसिस म्हणजे अशा लोकांमध्ये जास्त घाम येणे, ज्यांना थंड वातावरणात इतरांपेक्षा जास्त घाम फुटतो, कोणतीही शारीरिक क्रियाकलाप न करता किंवा कोणत्याही इतर स्पष्ट कारणाशिवाय देखील या लोकांना घाम येण्यास सुरुवात होते.

या रोगांमुळे येऊ शकतो अत्यधिक घाम

अमेरिकन हेल्थ वेबसाईट वेबएमडी डॉट कॉमच्या मते, अनेक रोग किंवा वैद्यकीय परिस्थितीमुळे जास्त घाम येऊ शकतो. जसे की, –

रजोनिवृत्ती :

स्त्रियांची मासिक पाळी बंद झाल्यावर त्यांना अत्यधिक घाम येण्याची समस्या देखील होऊ शकते.

थायरॉईड :

जेव्हा एखादा रुग्ण हायपोथायरॉईडीझमने ग्रस्त असतो तेव्हा त्याचे शरीर अधिक उष्ण आणि उष्णतेबद्दल खूपच संवेदनशील बनते. यामुळे अशा लोकांना जास्त प्रमाणात घाम येणे, ही समस्या सुरू होते.

मधुमेह :

जे लोक मधुमेहावरील इतर उपाय किंवा मधुमेहाचे औषध घेतात त्यांच्या शरीरात रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी असते आणि यामुळे त्यांना रात्री देखील जास्त घाम येतो. तथापि, एकदा ग्लूकोजची पातळी सामान्य झाली की पुन्हा जास्त घाम फुटत नाही (Know about excessive sweating it can be a symptom of these diseases).

हार्ट फेल्युअर :

अचानक जास्त घाम येणे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर किंवा हृदयाशी संबंधित कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. तथापि, हृदयविकाराच्या झटक्यामुळे, एखाद्या व्यक्तीला केवळ घाम येणार नाही, तर छातीच्या दुखण्यासह आपल्याला आणखी बरेच लक्षणे दिसतील.

मद्यपान :

केंद्रीय मज्जासंस्था, रक्ताभिसरण यासह अल्कोहोल शरीराच्या इतर अनेक भागावर देखील परिणाम करते. जास्त मद्यपान केल्यामुळे हृदयाची गती वाढते आणि यामुळे जास्त प्रमाणात घाम येण्याची समस्या उद्भवू शकते.

संधिवात :

संधिवात हा एक स्वयंचलित रोग आहे. ज्यामध्ये हाडांच्या सांध्यामध्ये वेदना उद्भवते. या आजाराने ग्रस्त असलेल्या काही रुग्णांना रात्री खूप घाम येण्याची समस्या देखील निर्माण होते.

ताण-चिंता :

या व्यतिरिक्त ज्या लोकांना ताण किंवा चिंतेची समस्या असते, त्यांनाही सामान्य माणसांपेक्षा जास्त घाम फुटतो. तसेच काही औषधांमुळे जास्त घाम येणे ही समस्या देखील उद्भवू शकते.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(Know about excessive sweating it can be a symptom of these diseases)

हेही वाचा :

राजमा खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे वाचा !

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.