Pomegranate : डाळिंब खाण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे फळ?
डाळिंब हे अतिशय चविष्ट फळ आहे. त्याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. मात्र ते खाल्ल्याने काही तोटेही होऊ शकतात. जाणून घेऊ या डाळिंब खाण्याचा परिणाम.
An Apple a day, keeps the doctor Away! अशी एक म्हण आहे. सफरचंद खाल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. एक सफरचंद खाल्याने संपूर्ण दिवस उर्जा मिळते आणि आजारांपासून संरक्षण (Protection from diseases) होते. मात्र सफरचंदाशिवाय इतरही अनेक फळं आहेत, ज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक असते. फळांमध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांच्याशिवाय फळांमध्ये इतरही पौष्टिक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्या फळांमध्ये डाळिंबाचाही (Pomegranate) समावेश आहे. डाळिंब हे गोड आणि अतिशय चविष्ट फळ असून अनेक आजारांवरही ते गुणकारी आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. ते व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी (Vitamin C & B)चा उत्तम स्त्रोत आहे. डाळिंबामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक (जस्त) मोठ्या प्रमाणात असते. डाळिंबाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात .मात्र ते खाल्ल्याने काही तोटेही (Benefits and side effects) होऊ शकतात.
डाळिंब खाण्याचे फायदे :
पेशींना बळकटी मिळते – डाळिंबामध्ये अनेक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसात इतर फळांच्या रसापेक्षा अधिक अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. तसेच सूज कमी होते.
कॅन्सरपासून बचाव – डाळिंबाचा रस हा कॅन्सरग्रस्त लोकांसाठी फायदेशीर ठरतो. प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना रोखण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा. तसेच त्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
अल्झायमरपासून बचाव – डाळिंबाचे दाणे अल्झायमर रोगाच्या वाढीला रोखतात. तसेच एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात.
पचन – डाळिंबाचा रस प्यायल्याने आतड्याची सूज कमी होते तसेच पचन सुधारते. मात्र डायरियाच्या रुग्णांना डाळिंबाचा रस न पिण्याचा सल्ला दिला जातो.
सांधेदुखी – डाळिंबाचा रस सांधेदुखी, वेदना आणि सूज कमी करण्यात फायदेशीर ठरतो.
हृदयविकार – हृदयविकाराची समस्या असल्यास, डाळिंबाचा रस पिणे लाभदायक ठरते. हृदय आणि धमन्या यांचे वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायचा सल्ला दिला जातो.
ब्लडप्रेशर – ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर मानला जातो.
मधुमेह – मधुमेह म्हणजेच डायबिटीजच्या उपचारात डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. डाळिंबाचा उपयोग इन्सुलिन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी केला जातो.
डाळिंब खाण्याचे तोटे :
- डाळिंबाचे साल, मूळ किंवा खोडाचा जास्त प्रमाणात वापर करणे असुरक्षित ठरते, कारण त्यामध्ये विष असू शकते.
- कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी डाळिंबाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
- अतिसाराचा त्रास होत असेल तर डाळिंबाचा रस सेवन करू नये.
- डाळिंबाचा रस त्वचेवर लावल्यास काही लोकांना खाज येणे, सूज येणे अथवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.