Yoga Session : वजन वाढण्यासाठी रोज घाला सूर्यनमस्कार, आरोग्याला मिळतील अनेक फायदे
Yoga Session : अनेक लोकांना वजन कमी करण्यात अडचण येत असेल व्हा वजन वाढवायचे असेल तर तुम्ही रोज न चुकता सूर्यनमस्कार घाला..
Yoga Session : नियमितपणे सूर्यनमस्कार (Suraya namaskar) घातल्यास शरीराला भरपूर एनर्जी (energy) मिळते व शरीराचा प्रत्येक भाग कार्यरत राहण्यास मदत मिळते. तुम्हाला जर वजन कमी (weight loss) करायचे असेल तर सूर्यनमस्काराचा वेग वाढवावा. संथ गतीने सूर्यनमस्कार घातल्यास वजन वाढवण्यात मदत होऊ शकते.
रोज, नियमितपणे सूर्यनमस्कार घातल्यास शरीराची ताकद (good for health) वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. तसेच भूकही वाढते, ज्यामुळे तुम्ही तंदुरुस्त व निरोगी राहू शकता.जमिनीवर चटई किंवा मॅट अंथरून पद्मासनात बसावे आणि ध्यानमुद्रा करून डोळे बंद करून ‘ ओम ‘ शब्दाचा उच्चा करत मन एकाग्र करावे. श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करावे.
प्रणामासन: योग मॅटवर सरळ उभे राहा. कंबर-मान ताठ ठेवून हाताने नमस्काराची मुद्रा बनवा. आता डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या.
हस्तउत्तनासन: दीर्घ श्वास घेत आता डोक्यावरून हात वर न्या आणि त्यानंतर हळूवारपणे डोके आणि कंबर मागे वाकवा. ही मुद्रा काही काळ तशीच ठेवा.
पादहस्तासन: आता श्वास बाहेर सोड पुढे वाका. हाताच्या बोटांनी पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
अश्व संचालनासन: एका पायाचा गुडघा जमिनीवर टेकवताना आपला एक पाय मागे घेऊन थोडा ताणावा. आता आपल्या हाताचे तळवे जमिनीवर ठेवा आणि मान वर करून आकाशाकडे बघा.
दंडासन: आपले दोन्ही हात आणि पाय सरळ करून एका रेषेत आणा. आता पुश-अपच्या पोझिशनमध्ये जा आणि ही स्थिती कायम ठेवा.
अष्टांग नमस्कार: आपले तळवे, छाती, गुडघे आणि पाय जमिनीजवळ ठेवा आणि थोडा वेळ याच स्थितीत रहा.
भुजंगासन: आपले तळवे जमिनीवर ठेवा आणि पोट जमिनीला टेकवून ठेवत मान मागे वाकवा.
अधोमुख शवासन: पाय जमिनीवर सरळ ठेवा आणि कंबरेपासून खालचा भाग वरच्या बाजूला उचला. आपले खांदे सरळ ठेवावे आणि तोंड आतल्या बाजूस ठेवा.
अश्व संचालनासन: आता दुसरा पाय मागे सरकवा. पहिल्या पायाचा गुडघा जमिनीजवळ वाकवा. आता हाताचे तळवे जमिनीवर ठेऊन मान वर करून आकाशाकडे बघा.
पादहस्तासन: आता पुढे वाकून आपल्या हातांनी पायाच्या बोटांना स्पर्श करा. आपले डोके गुडघ्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
हस्तउत्तनासन: आता प्रणमासनाच्या मुद्रेत उभे राहून हात वर करून सरळ ठेवा. त्यानंतर हात नमस्काराच्या मुद्रेत आणून मागे वाकावे.
प्रणामासन: हात जोडून प्रणाम करण्याची मुद्रा करा आणि सरळ उभे रहा.