Folic Acid Deficiency: शरीरातील फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे दिसू शकतात ही लक्षणे
व्हिटॅमिन बी9 (फोलेट) हे एक आवश्यक व्हिटॅमिन आहे, ते शरीरातील लाल पेशी आणि डीएनए बनवण्यात महत्वाची भूमिका बजावते.
नवी दिल्ली – रोगमुक्त शरीरासाठी आपण आपल्या आहाराची (diet) विशेष काळजी घेणे महत्वपूर्ण असते. आपले खाणे-पिणे असे असावे की त्यामध्ये सर्व पोषक तत्वं मुबलक प्रमाणात (nutrition) समाविष्ट असतील. असेच एक केमिकल आहे ज्याचे नाव आहे फोलेट (Folate). आपल्या शरीराला नियमितपणे 26 टक्के फोलेटची गरज असते. त्याची कमतरता निर्माण झाली तर शरीरात आजाराची अनेक लक्षणे दिसू लागतात. आज आपण फॉलिक ॲसिड (folic acid) किंवा फोलेटच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जाणून घेऊया.
फोलेट किंवा फॉलिक ॲसिड म्हणजे काय ? व्हिटॅमिन बी 9 (फोलेट) हे एक आवश्यक व्हिटॅमिन असून ते शरीरातील लाल पेशी आणि डीएनए बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. लाल पेशी आणि डीएनए हे आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. गर्भावस्थेदरम्यान हे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी हे महत्वाचे असते.
व्हिटॅमिन बी9 (फोलेट) ची आवश्यकता कशासाठी ?
व्हिटॅमिन बी9 किंवा फॉलिक ॲसिड (Folic Acid) हे आपल्या शरीरातील अन्न ब्रेकडाउन करण्यास मदत करते, त्यानंतर त्याचे (अन्नाचे) ग्लूकोजमध्ये परिवर्तन होते व त्यापासून आपल्याला उर्जा मिळते. आपले यकृत, त्वचा, केस आणि डोळ्यांचे आरोग्य कायम राखण्यासाठी आणि मज्जासंस्थेचे कार्य सुरळीतपणे चालावे यासाठी व्हिटॅमिन बी9 ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी9 हे शरीरात नव्या पेशी तयार करण्यास मदत करते. आणि आरोग्याच्या अनेक समस्या विकसित होण्यापासून रोखते. तसेच हे व्हिटॅमिन प्रजनन स्वास्थ्यासाठीही (Reproductive health)महत्वपूर्ण असते
फॉलिक ॲसिडच्या कमतरतेची लक्षणे
– खूप थकवा जाणवणे
– उर्जेची पातळी कमी होणे
– हात -पाय सुन्न पडणे
– जीभ खूप लाल होणे व त्यामध्ये वेदना होणे
– तोंडात फोड येणे
– स्नायू अशक्त होणे
– एखादी गोष्ट पाहण्यास त्रास होणे
– डिप्रेशन आणि भ्रम यासारख्या मानसिक समस्या जाणवू शकतात.
फॉलिक ॲसिडची कमतरता कमी दूर करण्यासाठी हा आहार घ्यावा
– पालक, शतावरी , तसेच स्प्राऊटस, बीट यासारख्या भाज्या
– ॲव्हकॅडो, टोमॅटो यासरख्या भाज्या व त्यांचा रस, तसेच संत्रं, टरबूज यासारखी फळे
– सूर्यफूल आणि अळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया
– अक्रोड, भुईमुगाच्या शेंगा
– राजमा
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)