Walking | गरोदरपणात चालायला जाणे फायदेशीर की नुकसानकारक ? जाणून घ्याल माहिती..
Walking | गर्भवती महिलांना डॉक्टर नेहमीच चालती-फिरती राहण्याचा किंवा चालायला जाण्याचा सल्ला देता. गर्भारपणात वॉकिंग केल्याने महिलेचे शरीर केवळ ॲक्टिव्ह राहत नाही तर आणखीही इतर फायदे मिळतात.
Walk In Pregnancy | गरोदरपणात स्त्रियांच्या (pregnant lady) शरीरातील ऊर्जेची पातळी थोडी कमी होते. याचे कारण म्हणजे वाढलेले पोट आणि थकवा. जर आपल्याला आपल्या गरोदरपणात (pregnancy) निरोगी आणि सामान्य वाटत असेल तर फिरायला, चालायला जाण्यास (walking) विसरू नका. चालणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे आणि यामुळे महिलेचे शरीर ॲक्टिव्ह राहते.
तज्ज्ञांच्या काय आहे मत
तज्ज्ञांच्या मते, गर्भारपणात शरीरात अनेक बदल (many changes in body) होत असतात. या बदलांना तोंड देण्यासाठी शरीराला अॅडजस्ट करावं लागतं. या संपूर्ण प्रक्रियेत गर्भवती स्त्रीने सक्रिय किंवा ॲक्टिव्ह राहणे खूप गरजेचे आहे. रोज चालायला जाण्याची सवय तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. चालण्याचे इतरही अनेक फायदे आहेत, त्याबद्दल जाणून घ्या..
गर्भारपणात वॉकिंग करण्याचे फायदे
मॉम जंक्शन नुसार, गरोदरपणात चालल्याने गर्भवती स्त्रीचे स्नायू टोन होतात. गरोदरपणात चालल्याने, वाढलेल्या पोटामुळे पायातील वेदना कमी होऊ शकतात. गरोदरपणात चालायला गेल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते. जर तुम्ही गर्भावस्थेत चालायला गेलात तर रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तसेच शरीरातील पेटके, वेदना आणि बद्धकोष्ठतेची तक्रारही कमी होते.
प्रसूतीवेळी त्रास नाही
गर्भावस्थेत वॉकिंग करायची सवय असेल तर प्रसूतीच्या वेळेस फारसा त्रास होत नाही. गर्भारपणात वॉकिंग करणे, ही एक चांगली सवय आहे. प्रसूती चांगली व्हावी आणि बाळाची तब्येतही चांगली रहावी यासाठी नीट काळजी घेऊन, सावधपणे वॉकिंग करावे.
या गोष्टी नक्की ठेवा लक्षात
गर्भावस्थेत रोज कमीत कमी अर्धा तास तरी चालायला जावे.
चालायला जाताना आरामदायक वाटतील अशा चपला किंवा बूट निवडावे.
बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन जरूर लावावे.
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पीत रहावे.
गर्भारपणात चालायला जाण्याच्या अर्धा तास आधी काहीतरी नक्की खावे.
हिरवळ किंवा छान झाडे आहेत अशा ठिकाणी चालायला जावे.
घाणेरड्या जागी बसू नये किंवा तिथे चालायला बिल्कुल जाऊ नये.