Cyber sickness: सायबर सिकनेस म्हणजे काय ? का होतो हा आजार ?

जे लोक दिवसभर लॅपटॉपवर काम करतात आणि रात्री उशीरापर्यंत मोबाईल बघत राहतात, त्यांच्या डोळ्यांना जराही विश्रांती मिळत नाही. यामुळे सायबर सिकनेसचा त्रास होतो.

Cyber sickness: सायबर सिकनेस म्हणजे काय ? का होतो हा आजार ?
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 12:33 PM

नवी दिल्ली – आजकाल बहुतांश लोक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा सर्वात जास्त वेळ हा लॅपटॉप, मोबाईल आणि टीव्हीसमोर (screen time) घालवतात. काही जण सोशल मीडियावर स्क्रोलिंग (social media use) करण्यात व्यस्त असतात. यामुळे मनोरंजन तर होते, पण हीच सवय तुमच्या आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचे (health problems) कारण बनू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का?  याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कशामुळे होतो सायबर सिकनेस ?

आजकाल केवळ तरूण पिढीच नव्हे तर लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तीही आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपवर घालवताना दिसतात. एकीकडे, यामुळे आपल्याला ज्ञान मिळते आणि आपण अपडेट राहतो, पण दुसरीकडे हीच सवय आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवण्याचे कारणही बनत आहे. जास्त वेळ स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर सर्वात जास्त परिणाम होतो. तर काही लोकांना अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, मळमळ होणे किंवा चक्कर येणे यासारखी लक्षणे देखील जाणवतात. ही लक्षणे सायबर सिकनेस म्हणून ओळखली जातात. हा त्रास कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

सायबर सिकनेसची लक्षणे खालीलप्रमाणे –

– डोकेदुखी

– घाबरल्यासारखे वाटणे

– चक्कर येणे

– थकल्यासारखे वाटणे

– औदासीन्य

– चिडचिड होणे

– कामावर लक्ष केंद्रित करता न येणे

– डोळे जळजळणे

– झोप न येणे

– मान व खांद्यामध्ये वेदना होणे

सायबर सिकनेसपासून कसा करावा बचाव ?

– सकाळी किंवा संध्याकाळी, वेळ मिळेल तेव्हा थोडाफार, हलका-फुलका व्यायाम करावा.

– डोळ्यांचाही व्यायाम करावा.

– स्क्रीन टाइम किंवा स्क्रीन पाहण्याची वनेळ कमी करावी. कामानंतर मोबाईल, टीव्ही कमी पहावा.

– ऑफीसचे काम करण्यासाठी तर स्क्रीनचा वापर करावाता लागतो, मात्र त्याशिवाय उरलेल्या वेळात मोबाईल किंवा टीव्हीची स्क्रीन पाहू नये.

– रात्री झोपताना मोबाईल बिलकूल वापरू नका.

– लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ब्लू फिल्टर लावावा.

– मोबाईल, लॅपटॉप यांची फॉन्ट साईज मोठी ठेवावी.

– लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनचे कॉन्ट्रास्ट कमी ठेवावे.

– स्क्रीन स्क्रोल करण्याचा वेग कमी करावा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.