सावधान ! जेवणानंतर चहा पित असाल तर होऊ शकतात ‘ हे ‘ 5 आजार

अनेक लोकांना जेवण झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. जेवणानंतर चहा पिणाऱ्यांना आरोग्यासंदर्भात काही त्रास होऊ शकतात.

सावधान ! जेवणानंतर चहा पित असाल तर होऊ शकतात ' हे ' 5 आजार
चहा
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 6:23 PM

 मुंबई : जगात कोट्यावधी लोक चहा (Tea) पितात. बहुतांश जणांना सकाळी उठल्यावर दिवसाची सुरूवात एक कप चहाने करायची सवय असते. तर काही लोक जेवणानंतरही लगेच चहा (drinking tea afetr meal) पितात. तुम्हीही त्या लोकांपैकी एक असाल, तर तुमची ही सवय लगेच बदला अन्यथा तुम्हाला गंभीर समस्यांचा सामना (side effects) करावा लागेल. खरंतर चहामध्ये कॅफिन नावाचा एक घटक असतो, जो शरीरात कॉर्टिसॉल किंवा स्टिरॉईड हार्मोन  वाढवते. ज्यामुळे आरोग्यासंदर्भातील अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जेवणानंतर चहा प्यायल्याने काय त्रास होऊ शकतो, हे समजून घेऊया.

ब्लडप्रेशर वाढते –

ज्या व्यक्ती जेवल्यानंतर लगेच चहाचे सेवन करतात त्यांना हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. चहामध्ये कॅफेन असते, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला हायपर-टेन्शन किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर जेवणानंतर चहा बिलकुल पिऊ नका.

हृदयासाठी धोकादायक –

जर तुम्हाला जेवण झाल्यावर लगेच चहा प्यायची सवय असेल, तर ती लगेच सोडा. या सवयीमुळे तुमचे हृदय आजारी पडू शकते. असे केल्याने हृदयाचे ठोकेही अधिक वेगवान होतात.

पचनाशी संबंधित त्रास –

जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने पचनसंस्था कमकुवत होते, ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. एवढंच नव्हे तर असे केल्याने शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वंही उपलब्ध होत नाहीत. चहामध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त असल्यामुळे संबंधित व्यक्तीला गॅस, अॅसिडिटीच्या समस्या होऊ लागतात.

डोकोदुखीचा त्रास –

जेवल्यानंतर चहा प्यायल्याने डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. खरंतर, जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीरात गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. शरीरातील गॅसमुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.

लोहाची कमतरता –

जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. चहा प्यायल्याने शरीरात प्रथिनांसह आवश्यक ती पोषक तत्वं नीट शोषली जात नाहीत. ज्यामुळे लोहाची अथवा रक्ताची कमतरता निर्माण होते. त्यामुळे ॲनिमियाचा त्रासही होऊ शकतो.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.