अभी तो मैं जवान हूँ… हे अँटी एजिंग पदार्थ वापराल, तर 50व्या वर्षीही 30चे दिसाल…

तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षीही 30 व्या वर्षासारखे तरूण दिसायचते असेल तर आत्तापासूनच तुमच्या सवयी सुधारा. यासाठी सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच व्यायाम आणि पुरेशी झोप घेणेह महत्वाचे ठरते.

अभी तो मैं जवान हूँ... हे अँटी एजिंग पदार्थ वापराल, तर 50व्या वर्षीही 30चे दिसाल...
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 10:40 AM

नवी दिल्ली – प्रत्येका व्यक्तीला कायम तरूण (young look) दिसण्याची इच्छा असते, परंतु त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि निरोगी सवयींचा जीवनात समावेश करावा लागतो. खरंतर आपण काय खातो, आपला आहार (food) काय यामध्ये दीर्घायुष्याचे रहस्य दडलेले असते, पण जर सकस आहार घेतला तर तुम्ही वयाच्या 50 व्या वर्षीही 30 वर्षांचे दिसाल. फक्त ते (चांगली सवय) अंगीकारण्याची गरज आहे. सहसा अयोग्य सवयींमुळे (bad habits) वय कमी होते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या सवयी सुधारल्या तर तुम्हीही दीर्घायुषी होऊ शकता.

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की निरोगी आहाराचा दीर्घायुष्य आणि कायम तरूण राहण्यात मोठा हातभार असतो. यासोबतच शारीरिक हालचाली म्हणजेच व्यायाम आणि सिगारेट आणि मद्यपान यांसारख्या वाईट सवयींपासून लांब राहणे उत्तम ठरते.

सदैव चिरतरूण दिसण्यासाठी अँटी-एजिंग फूड

हे सुद्धा वाचा

असे काही पदार्थ आहेत जे सेवन केल्याने चेहऱ्यावरील वयाचा प्रभाव कमी होतो. यामुळे त्वचेवर फ्री रॅडिकल्स होत नाहीत, त्यामुळे त्वचा नेहमी तरुण दिसते.

1) जलकुंभी – ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण त्वचेला कायम तरुण ठेवण्यासाठी जलकुंभी ही एक अद्भुत गोष्ट आहे. जलकुंभीमध्ये पोषक तत्वं असतात जे शरीराला हायड्रेट ठेवतात. यामध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअयम, फॉस्फरस आणि इतर अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात जे चेहऱ्याच्या त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणून काम करतात.

2) लाल सिमला मिरची – लाल सिमला मिरचीमध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सीडेंट्स असतात ज्यात अँटी-एजिंग गुणधर्म असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि कॅरोटीनोइड्स असतात जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. यामध्ये अनेक प्रकारचे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात, जे त्वचेला नेहमी तरुण ठेवतात.

3) पपई – पपई केवळ पोटासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट आढळतात, ज्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते.

4) ब्लूबेरी – ब्लूबेरी खायला जेवढी चविष्ट तेवढीच ती त्वचेसाठीही गुणकारी असते. हे एक अँटी एजिंग फूड आहे जे वयाचा प्रभाव कमी करते. यामुळे शरीरात आर्द्रता टिकून राहते. ब्लूबेरी ही सूर्यप्रकाश, तणाव आणि प्रदूषणामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्याची सक्षम आहे.

5) फ्लॉवर – फ्लॉवरमध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी आणि अँटी- एजिंग गुणधर्म आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, फोलेट, ल्युटीन, कॅल्शिअम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात, ज्यामुळे त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.