भारतात रशियाची Sputnik V लस बनवणारी डॉ. रेड्डीज कंपनीचं उत्पन्न किती? निवळ्ळ नफा ऐकून अवाक व्हाल
भारतात रशियाची Sputnik V कोरोना लसीचं उत्पन्न डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करणार आहे. विशेष म्हणजे डॉ. रेड्डीजने भारतात रशियन कोरोना लस किती रुपयांना उपलब्ध होणार याची किंमतही जाहीर केलीय.
नवी दिल्ली : भारतात रशियाची Sputnik V कोरोना लसीचं उत्पन्न डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करणार आहे. विशेष म्हणजे डॉ. रेड्डीजने भारतात रशियन कोरोना लस किती रुपयांना उपलब्ध होणार याची किंमतही जाहीर केलीय. स्पुटनिक व्हीची किंमत 948 रुपये असून त्यावर 5 टक्के जीएसटी असेल. अशाप्रकारे या लसीच्या एका डोसची किंमत 995.40 रुपये इतकी असेल (Know all about production of Russian Sputnik V Vaccine in India and profit of Dr Reddys).
भारतातील औषधनिर्माण क्षेत्रातील प्रमुख डॉ. रेड्डी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कारण हीच कंपनी रशियाची कोरोना लस असलेल्या स्पुटनिक व्हीचं भारतात उत्पादन करणार आहे. डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांनी त्याची किंमत जाहीर केली आहे. स्पुटनिक व्हीची किंमत 948 रुपये आणि 5 टक्के जीएसटी असेल. अशा प्रकारे, एक डोस 995.40 रुपये असेल. हे झालं एका लसीचं, मात्र डॉ. रेड्डीजची यात किती कमाई आहे हे माहित तुम्हाला आहे का?
डॉ रेड्डीजचं उत्पन्न किती?
डॉ. रेड्डीज ही देशातील फार्मा क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 1914.9 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर या कालावधीत कंपनीचा महसूल 18,972 कोटी रुपयांवर गेला. गुंतवणुकदारांना खूष करण्यासाठी कंपनीने प्रति शेअर 25 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केलाय.
कुठून होतं उत्पन्न?
जेनेरिक औषधांच्या व्यवसायातून कंपनी मोठ्या प्रमाणात पैसे कमवते. सोप्या शब्दात सांगायचे तर रोगांच्या उपचारासाठी संशोधनानंतर साधं औषध बनवलं जातं. असं औषध बनवणाऱ्या कंपनीला 15 वर्षांपर्यंत मालकी हक्काने औषध विकून नफा कमावता येतो. 15 वर्षानंतर हेच औषध कोणतीही औषध कंपनी वेगवेगळ्या स्वरुपात उत्पादित करुन विकू शकते. यातील काही कंपन्या हे औषध स्वस्तात विकते, तर काही कंपन्या प्रचंड महागात विकते. या व्यवसायात डॉ. रेड्डीजला 3873.7 कोटी रुपयांचा नफा झालाय.
जर आपण जगभराचा विचार केला तर युरोपमध्ये या कंपनीचा व्यवसाय 15 टक्के आहे. त्याचबरोबर, उदयोन्मुख बाजारपेठेत कंपनीचा व्यवसाय वर्षात 10 टक्के आहे. कंपनीच्या एकूण व्यवसायाचा विचार केला तर त्यात उत्तर अमेरिकेतील व्यवसायाचा वाटा 37 टक्के आहे. तेथे कंपनीचा वार्षिक व्यवसाय 3 टक्के आणि तिमाहीत 1 टक्क्याने घसरून 1749.1 कोटी रुपये झाला.
कॅनडामध्ये कंपनीने 6 नवी औषधं बाजारात आणलीत. यात विगाबॅट्रिन (Vigabatrin) टॅबलेट्स, फेबुक्सोस्टेट (Febuxostat) टॅबलेट्स, कॅपेसिटाबाइन (Capecitabine) टॅब्लेट्स, फ्लूफेनाजाइन हाइड्रोक्लोराइड (Fluphenazine Hydrochloride) टॅब्लेट्स, लॅसोप्रजोल ओडी (Lansoprazole OD) टॅब्लेट्स आणि बायरेटेरोन एसेटेटचा (biraterone Acetate) समावेश आहे.
फक्त डॉ. रेड्डीच भारतात स्पुतनिक व्ही लस तयार करणार?
RDIF ने म्हटलं आहे की डॉ. रेड्डी व्यतिरिक्त आणखी 5 भारतीय कंपन्या या लसीची निर्मिती करतील. या पाच कंपन्यांची नावं ग्लँड फार्मा, हेटरो बायोफार्मा, पॅनसीआ बायोटेक, स्टेलिस बायोफार्मा, विरचोव बायोटेक, अशी आहेत.
‘डॉ. रेड्डीज कोरोनाचं औषधंही बनवत आहे’
एली लिली या औषधी कंपनीने कोविड 19 चे औषध बार्सिटीनिबच्या उत्पादनासाठी भारतातील 3 कंपन्यांसह, टॉरंट फार्मास्यूटिकल्स, डॉ. रेड्डीज आणि एमएसएन प्रयोगशाळांसह अतिरिक्त स्वयंसेवी परवाना करार केला आहे. एली लिलीने करारा करुन या तिन्ही कंपन्यांना परवाने दिले आहेत.
हेही वाचा :
स्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती?; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर
रशियात सिंगल डोसवाल्या ‘स्फुटनिक लाईट’ कोरोना लसीच्या वापराला मंजुरी, 80 टक्के परिणामकारकता असल्याचा दावा
1 मेपासून रशियाची Sputnik V लस भारताच्या लसीकरणाचा एक भाग असणार, जाणून घ्या सर्वकाही
व्हिडीओ पाहा :
Know all about production of Russian Sputnik V Vaccine in India and profit of Dr Reddys