भारतातील कंडोम वापराचं प्रमाण कमी का? पहिल्याच ‘Condomology’ अहवालात धक्कादायक खुलासे

भारतातील भावी पिढी निरोगी राहण्यासाठी त्यांचं प्रजनन आरोग्य हा कळीचा मुद्दा आहे. मात्र, भारतातील पहिल्या कंडोमोलॉजी सर्व्हेक्षणातून धक्कादायक खुलासे झाले आहेत.

भारतातील कंडोम वापराचं प्रमाण कमी का? पहिल्याच 'Condomology' अहवालात धक्कादायक खुलासे
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 8:34 PM

नवी दिल्ली : भारताील अर्धी लोकसंख्या ही 24 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांची आहे. याशिवाय 35 वर्षांखालील तरुणांचं लोकसंख्येतील प्रमाण तब्बल 65 टक्के आहे. या तरुणाचा अचूक उपयोग करुन देशाच्या विकासात त्यांना सहभागी करुन घ्यायचं असेल तर त्यांचं आरोग्य हा ऐरणीचा प्रश्न आहे. विशेषतः त्यांची भावी पिढी निरोगी राहण्यासाठी त्यांचं प्रजनन आरोग्य हा कळीचा मुद्दा आहे. मात्र, भारतातील पहिल्या कंडोमोलॉजी सर्व्हेक्षणातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. यानुसार 20 ते 24 वयोगटातील 80 टक्के तरुण लैंगिक संबंधांच्या वेळी निरोध (कंडोम) वापरत नसल्याचं समोर आलंय. याचा संबंधित तरुणांच्या आणि त्यांच्या एकूणच आरोग्यावर घातक परिणाम करेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय (Know all facts about usage statistics of Condom in India and reasons behind it Condomology Survey).

कंडोमोलॉजी सर्वे काय आहे?

कंडोमोलॉजी हा शब्द कंझ्युमर (ग्राहक), कंडोम (निरोध) आणि सायकोलॉजी (मानसशास्त्र) या तीन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजेच या सर्वेत या तीनही मुद्द्यांवर अभ्यास करण्यात आलाय. भारतातील तरुणांचं लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बाजारपेठेतील कंडोम उत्पादक, पुरवठादार यांच्या ‘कंडोम अलायन्स’कडून हा अभ्यास करण्यात आलाय. कंडोमचा वापर न केल्यानेच भारतात अनियोजित गर्भधारणेच्या अनेक घटना, असुरक्षित गर्भपाताच्या मार्गाचा उपयोग आणि लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांचं प्रमाण अधिक असल्याचंही उघड झालंय.

भारतात 20 ते 24 वयोगटातील बहुतांश तरुणांकडून कंडोमचा वापर नाही

अहवालात 20 ते 24 वयोगटातील बहुतांश तरुणांनी लैंगिक संबंधांवेळी कंडोमचा वापरच केलेला नसल्याचं समोर आल्यानं याबाबत जनजागृती आणि प्रबोधन करणं गरजेचं असल्याचं नमूद केलंय. असं केलं तरच लैंगिक आरोग्य आणि सुरक्षित गर्भधारणा होईल. अन्यथा भारतातील या तरुणांना या पातळीवर मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.

भारतात कंडोमचा वापर इतका कमी का?

भारतातील कंडोम वापराचं सरासरी प्रमाण हे 5.6 टक्के इतकं कमी आहे. समाजातून होणारे संस्कार आणि कंडोम वापरले तर लोक आपल्याला काय म्हणतील किंवा कोण काय विचार करेल अशा अनेक शंका सुरक्षित लैंगिक संबंध आणि लैंगिक आरोग्याच्या मार्गातील प्रमुख अडसर आहेत.

अहवालातील धक्कादायक खुलासे काय?

भारतातील केवळ 7 टक्के महिला आणि 27 टक्के पुरुष लग्नाआधीच्या लैंगिक संबंधाच्या वेळी कंडोम वापरतात. दुसरीकडे केवळ 3 टक्के महिला आणि 13 टक्के पुरुष नियमितपणे लैंगिक संबंधांच्या वेळी कंडोम वापरतात. ही सर्व आकडेवारी 2014-15 मधील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातही (NFHS) पाहायला मिळाली होती.

कंडोम वापराबाबत जनजागृतीसाठी अनेक प्रयत्न होऊनही भारतातील कंडोम मार्केटमधील वाढ मागील अनेक वर्षांपासून केवळ 2 टक्के इतकी आहे. दुसरीकडे एचआयव्ही (HIV) संसर्गात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

हेही वाचा :

रोमान्सच्या राजधानीत कंडोमची विक्री घटली, मंदीचा फटका

दिल्लीतील टॅक्सी चालक फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम का ठेवतात?

कंडोम कंपन्यांकडून सरकारला कोट्यावधींचा चुना

व्हिडीओ पाहा :

Know all facts about usage statistics of Condom in India and reasons behind it Condomology Survey

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.