Long Covid | कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही 2-3 महिने दिसू शकतात लक्षणे! जाणून घ्या ‘लाँग कोव्हिड’बद्दल…

कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतरही म्हणजेच रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही, जर त्यांना हलका खोकला, डोकेदुखी, शरीरात वेदना, थकवा, श्वास घेण्यात त्रास किंवा चव न लागणे, सुगंध न येणे या समस्या दिसत असतील, तर त्याला ‘लाँग कोव्हिड’ म्हणतात.

Long Covid | कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही 2-3 महिने दिसू शकतात लक्षणे! जाणून घ्या ‘लाँग कोव्हिड’बद्दल...
तुमच्या घरात पॉझिटिव्ह पेशंट आहे का?
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 11:00 AM

मुंबई : कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. इतकेच नाही तर दररोज कोरोना विषाणूशी (Corona Virus) संबंधित नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. बर्‍याच अभ्यासानुसार, कोरोनाची सौम्य लक्षणे (Mild Symptoms) असलेल्या रुग्णांपैकी जवळजवळ 50 टक्के असे लोक आहेत, जे यातून रिकव्हर झाल्यानंतरही त्यांना पूर्णपणे बरे वाटत नाही. अशा रूग्णांमध्ये, कोरोनाशी संबंधित काही समस्या सुमारे 6 महिन्यांपर्यंत दिसतात. याला ‘लाँग कोव्हिड’ (Long Covid) किंवा ‘पोस्ट कोविड सिंड्रोम’ (Post Covid Syndrom) असे नाव देण्यात आले आहे (Know details about what is long covid and its symptoms).

‘लाँग कोव्हिड’ म्हणजे काय? (what is long covid)

बर्‍याच संशोधनात असे सूचित केले गेले आहे की, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण सामान्यत: संसर्ग झाल्यापासून 1 ते 2 आठवड्यांच्या आत बरे होतात. तर, गंभीर लक्षणे (Sever Symptoms) असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी 6-7 आठवडे लागतात असे दिसून आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतरही म्हणजेच रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही, जर त्यांना हलका खोकला, डोकेदुखी, शरीरात वेदना, थकवा, श्वास घेण्यात त्रास किंवा चव न लागणे, सुगंध न येणे या समस्या दिसत असतील, तर त्याला ‘लाँग कोव्हिड’ म्हणतात.

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये लाँग कोव्हिडची समस्या अधिक

ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये 20 हजार लोकांनी भाग घेतला होता. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, कोरोना संसर्ग झालेल्या 5 पैकी 1 व्यक्तीमध्ये बरे झाल्यानंतरही 5 ते 12 आठवड्यांपर्यंत या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. लाँग कोव्हिडची ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दुप्पट दिसून आली आहे (Know details about what is long covid and its symptoms).

लाँग कोव्हिडच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

सतत खोकला : जर कोरोनामुळे रुग्णाला खोकला येत असेल, तर त्यामुळे श्वसनमार्गामध्ये जळजळ होऊ शकतो. ज्यामुळे संसर्ग बरा झाल्यावरही कफाची समस्या कित्येक आठवडे किंवा महिने टिकू शकते.

डायरिया :  अभ्यासानुसार, कोरोनामुळे पाचन प्रणालीवर वाईट परिणाम झाल्याने अतिसाराची समस्या बराच काळ टिकून राहू शकते.

भूक न लागणे : आजारातून बरे झाल्यानंतर, बर्‍याच रुग्णांमध्ये चव घेण्याची क्षमता नसते, ज्यामुळे त्यांना भुक देखील लागत नाही आणि काही खावे असे देखील वाटत नाही. ही समस्या कित्येक आठवडे टिकून राहते.

अशक्तपणा : अशा अनेक अभ्यासामध्ये नोंदवले गेले आहे की, लाँग कोव्हिड ग्रस्त असलेले जवळजवळ 80 टक्के रुग्ण थकल्यासारखे दिसतात आणि त्यांना अशक्तपणा जाणवतो.

श्वास लागणे : कोरोना हा एक श्वसन रोग आहे, हे स्पष्ट आहे की संसर्ग बरा झाल्यानंतरही रुग्णांना दीर्घ काळापर्यंत श्वासोच्छवासाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

आवाज जड होणे : कित्येक वेळा रिकव्हरीनंतरही, घसा खवखवणे, घसा दुखणे किंवा रूग्णांचा आवाज जड होणे यासारख्या समस्या कित्येक आठवड्यांपर्यंत कायम राहतात.

(टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(Know details about what is long covid and its symptoms)

हेही वाचा :

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेय? रुग्णालयात कोणी दाखल व्हावे, कोणी घरीच उपचार घ्यावेत?

Double Mask | हवेतून कोरोना पसरण्याचा धोका अधिक, दोन मास्क वापरण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.