Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतू बदलताच आजारी पडता का ? लगेच होतं इन्फेक्शन ? हे पदार्थ खाऊन वाढवा रोगप्रतिरकारक शक्ती, शरीर बनेल दणकट

How to Boost Immunity : बाह्य आक्रमणांशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित केली जाते. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे.

ऋतू बदलताच आजारी पडता का ? लगेच होतं इन्फेक्शन ? हे पदार्थ खाऊन वाढवा रोगप्रतिरकारक शक्ती, शरीर बनेल दणकट
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 9:39 AM

नवी दिल्ली : आपल्या आजूबाजूला असंख्य जीवाणू आणि जंतू (germs) असतात. आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. पण जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ते आपल्या नाका-तोंडात जातात. यातील अनेक जीवाणू विविध रोगास (diseases) कारणीभूत असतात. असे असूनही आपल्याला कोणताही आजार होत नाही. असे का घडते याचा कधी विचार केला आहे का? खरंतर, आपल्या शरीरात एक स्वयंचलित रोगप्रतिकारक शक्ती कार्यरत असते ज्याला इम्युनिटी सिस्टिम (Immunity system) असेही म्हटले जाते. आपली प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर आपण निरोगी राहतो. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होताच आपल्याला अनेक संसर्ग, आजार होऊ लागतात.

इम्युन सिस्टिम ही आपल्या संपूर्ण शरीराची अशी रोगप्रतिकारक शक्ती आहे जी या बाह्य आक्रमणकारी घटकांना दूर करते आणि शरीरातील पेशी निरोगी ठेवते. रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये रक्त पेशी, प्रथिने, अँटीबॉडीज आणि काही रसायने समाविष्ट असतात. ते एकत्रितपणे जीवाणू, विषाणू, परजीवी आणि बुरशी दूर करतात किंवा मारतात. पण मग ही रोगप्रतिकारक शक्ती चांगली आणि मजबूत कशी बनवू शकतो ? यासाठी सकस आहार आणि काही वाईट सवयी सोडून देणे आवश्यक आहे.

कशी वाढवावी रोगप्रतिकारक शक्ती ?

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आपल्या वाईट सवयी आणि अस्वास्थ्यकर अन्नामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. इम्युन सिस्टीम कमकुवत होताच शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होऊ लागतात. फ्री रॅडिकल्समुळे पेशींची रचना बिघडते. म्हणजेच, पेशी त्यांचे नियमित कार्य करण्यास सक्षम रहात नाहीत आणि बाह्य आक्रमणकर्त्यांना पेशींमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळते. शरीरात फ्री रॅडिकल्सचे प्रमाण वाढले की कर्करोगासारख्या आजारांना प्रवेश मिळण्याची संधी मिळते.

शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होण्यापासून रोखण्यासाठी आपण सकस आहार घेतला पाहिजे. ज्या अन्नपदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते ते शरीरात फ्री रॅडिकल्स तयार करत नाहीत आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवतात, असे डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय सिगारेट आणि अल्कोहोल यांचे सेवन केल्यानेही फ्री रॅडिकल्स वाढतात.

हे पदार्थ वाढवतात इम्युनिटी / रोगप्रतिकारक शक्ती

1) रंगीबेरंगी फळं

रंगीबेरंगी फळांमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. ब्लॅकबेरी, रास्पबेरी, क्रॅनबेरी, आंबा, लाल द्राक्षे, स्ट्रॉबेरी, बेरी, अंजीर, चेरी, पेरू, जर्दाळू, टरबूज, पपई, टोमॅटो इत्यादींमध्ये पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीरात मुक्त किंवा फ्री रॅडिकल्स तयार होण्यापासून रोखतात.

2) सायट्रस फ्रुट्स

सायट्रस फ्रुट्स किंवा , लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. आणि व्हिटॅमिन सी हे पांढऱ्या रक्त पेशी वाढवते. पांढऱ्या रक्त पेशी रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. यासाठी संत्री, लिंबू, तुती, किवी, आवळा, द्राक्षे, द्राक्षे, सर्व आंबट-गोड फळांचे सेवन केले पाहिजे.

3) हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात आढळतात. कोबी, फ्लॉवर, पालक, गाजर, बीटरूट, ॲव्होकॅडो, मुळा, रताळे, भोपळा, केळी, शेंगा इत्यादी भाज्या केवळ अँटिऑक्सिडेंट्सनेच भरलेल्या नाहीत तर त्यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व देखील असतात. जे शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होऊ देत नाहीत.

4) बिया

भोपळ्याच्या बिया, चिया बिया, जवसाच्या बिया, मोहरी, काकडीच्या बिया इत्यादी बिया सुपरफूड आहेत. या बिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात तज्ञ आहेत. सर्व बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते जे अनेक रोगांचे शत्रू असते. त्यामुळेही शरीराचे अनेक रोगांपासून संरक्षण होते

5) धूम्रपान व मद्यपान सोडा

सिगारेट, दारू, अल्कोहोल यांचे सेवन हे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढवतात, त्यामुळे ते टाळावे. तुम्ही तणावात असाल आणि पुरेशी झोप घेतली नाही तरी फ्री रॅडिकल्स तयार होऊ लागतात. त्यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होऊ नयेत, यासाठी नियमित व्यायाम करा, असेही डॉक्टरांनी सांगितले.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.