जरा जपून, डिओड्रंटमधून निघणारा गॅस जीवघेणा ठरू शकतो; लहान मुलांसाठी किती घातक डिओ?

आपल्या खोलीत डिओड्रंट स्प्रे केल्यानंतर एक मुलगी मृतावस्थेत आढळली. डिओच्या सुगंधामुळे तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लहान मुलांसाठी डिओ किती धोकादायक आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

जरा जपून, डिओड्रंटमधून निघणारा गॅस जीवघेणा ठरू शकतो; लहान मुलांसाठी किती घातक डिओ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 11:30 AM

नवी दिल्ली -आपल्यापैकी बहुतांश लोकं दररोज डिओड्रंटचा (deodorant) वापर करतात, तो हायजीन रूटीनचा एक भागच झाला आहे. मात्र खूप कमी लोकांना हे माहीत असेल की डिओच्या वापरामुळे कधीकधी नुकसानही (side effects of deo) होऊ शकतं. डिओमध्ये असलेली घातक रसायने कधीकधी त्वचेला हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे पुरळ येणे (rashes on skin) आणि जळजळ होणे असा त्राही होऊ शकतो.

इतकेच नव्हे तर नुकतीच अशी एक घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. डिओड्रंट वापरल्याने जॉर्जिया ग्रीन या 14 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घचना समोर आली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चुकून एरोसोलचा वास घेतल्यानंतर मुलीला हृदयविकाराचा झटका आला. जॉर्जिया ग्रीन ही निरोगी व तंदुरुस्त होती यापूर्वी ती कधीही गंभीर आजारी पडली नव्हती. तिने तिच्या खोलीत डिओड्रंट फवारले होते आणि त्यानंतर जॉर्जिया तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली. तिच्या पालकांनी तिला सांगितले की ती ऑटिस्टिक होती आणि खोलीत डिओड्रंट फवारल्याने तिला शांत वाटायचे.

डिओड्रंट वापरणे घातक कसे ठरू शकते ?

हे सुद्धा वाचा

डिओड्रंटच्या एरोसोलमध्ये टॉक्सिक आणि विषारी रसायने आणि वायू असतात. म्हणजेच, डिओ देखील घातक ठरू शकतो आणि अशा घटना फक्त मुलांपुरत्या मर्यादित नाहीत. याबाबत जनजागृती करून असे अपघात टाळता येतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच मुलांना डिओपासून दूर ठेवणेही महत्त्वाचे आहे. डीओ ऐवजी टॅल्कम पावडर वापरणे चांगला पर्याय ठरू शकतो, पण त्याचा वापरही मर्यादेत करावा.

कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय ?

कार्डिॲक अरेस्ट ही एक प्रकारची मेडिकल इमर्जन्सी असते, ज्यामध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो. कार्डिॲक अरेस्टमध्ये हृदयाचे ठोके अचानक बंद होतात. कार्डिॲक अरेस्ट आल्यास रुग्ण अचानक बेशुद्ध होतो आणि त्याला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते.

काय आहेत कार्डिॲक अरेस्टची लक्षणे ?

– छातीत वेदना होणे

– विनाकारण घरघर

– श्वास लागणे

– बेशुद्धी

– चक्कर येणे

– हलके वाटणे

– अनियमित हृदयाचा ठोका

– धडधडणे

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.