काय सांगता ? स्ट्रेसचे पण असतात एवढे प्रकार ! तुम्हालाही जाणवतात का ही लक्षणं ?

तणाव म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीच्या किंवा घटनेच्या दबावाला शरीराचा मिळालेला प्रतिसाद. ही प्रतिक्रिया शारीरिक, मानसिक किंवा भावनिक कोणत्याही प्रकारची असू शकते.

काय सांगता ? स्ट्रेसचे पण असतात एवढे प्रकार ! तुम्हालाही जाणवतात का ही लक्षणं ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 8:19 AM

नवी दिल्ली : रक्त तपासणी करायची असेल, किंवा एकट्याने एखाद्या सहलीला जायचं असो अथवा स्टार्टअपसाठी प्रथमच गुंतवणूकदारासोबत मीटिंग शेड्यूल केली असेल- थोडक्यात आयुष्यातील कोणतीही महत्वाची गोष्ट करायची असेल तर त्या सर्वांमुळे आपल्याला घाम फुटतो आणि हृदयाचे ठोकेही जलद होतात. ही सर्व स्ट्रेस अर्थात तणावाची (stress) लक्षणे आहेत. तणाव ही शरीरातील अशी प्रतिक्रिया आहे, जी शारीरिक तसेच भावनिक आरोग्यावर (effect on mental health) परिणाम करते. तणावामुळे मानसिक आजार तर होतातच पण हृदयविकाराचा झटका (heart attack) येण्याचाही धोका असतो.

नुकतेच बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यूही हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समजते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते तणावाचा थेट संबंध हृदयविकाराशी आहे. पण तणावाचे प्रकार काय आहेत हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?

स्ट्रेस अर्थात ताण म्हणजे काय ?

हे सुद्धा वाचा

तणाव म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीच्या किंवा घटनेच्या दबावाला शरीराचा मिळालेला प्रतिसाद. ही प्रतिक्रिया शारीरिक, मानसिक किंवा भावनिक कोणत्याही प्रकारची असू शकते. नोकरी गमावणे, कौटुंबिक आजार किंवा आर्थिक समस्या ही तणाव निर्माण होण्याची काही सामान्य कारणे आहेत. तणावाचे तीन प्रकार असतात – ॲक्युट, एपिसोडिक ॲक्युट आणि क्रॉनिक स्ट्रेस.

याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया

ॲक्युट स्ट्रेस

प्रत्येकाने ॲक्युट स्ट्रेस अर्थात तीव्र ताण अनुभवला असेल. हे शरीरात त्वरित प्रतिक्रिया आणि आव्हानात्मक परिस्थितीसारखे आहे. उदाहरणार्थ, तुमचा जर अपघात होत असेल तर तो टाळताना तुम्ही अशा तणावाचा सामना करू शकता. तीव्र तणावाच्या या भागांमुळे सहसा कोणतेही नुकसान होत नाही. परंतु हे देखील विशिष्ट परिस्थितीत एखाद्या व्यक्तीसाठी योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकतात.गंभीर तीव्र ताण हे पूर्णपणे भिन्न आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे ठरते. या तणावामुळे जीवघेणी स्थिती किंवा इतर मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

एपिसोडिक ॲक्युट स्ट्रेस

एपिसोडिक ॲक्युट स्ट्रेस किंवा एपिसोडिक तीव्र तणाव अशा परिस्थितीमध्ये उद्भवतो जेव्हा एखादी व्यक्ती सतत ॲक्युट स्ट्रेस अनुभवत असते. एखादी अशा घटनेबद्दल व्यक्ती सतत चिंता करत असते आणि ती घटना घडते, अशा वेळी एपिसोडिक ॲक्युट स्ट्रेसचा सामना करावा लागू शकतो. याचा त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

क्रॉनिक स्ट्रेस

जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही काळासाठी जास्त ताण येतो तेव्हा त्याला क्रॉनिक स्ट्रेस म्हणतात. दीर्घकाळ तणावामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे नैराश्य, रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.