Periods Delaying Pills : मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्यांचा वापर कितपत सुरक्षित? जाणून घ्या

मासिक पाळीला विलंब करणाऱ्या औषधांच्या मदतीने ती थांबवणे खूप सोपे झाले आहे. त्या गोळ्यांच्या मदतीने, काही महत्वपूर्ण दिवसांमध्ये मासिक पाळी तात्पुरती थांबवली जाऊ शकते. पण त्याआधी काही खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे.

Periods Delaying Pills : मासिक पाळी थांबवण्यासाठी  गोळ्यांचा वापर कितपत सुरक्षित? जाणून घ्या
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 9:04 AM

नवी दिल्ली : आपल्यापैकी बहुतांश महिला त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने, कधी ना कधी मासिक पाळी (Periods) थांबवण्यासाठी अथवा पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. कधी हे कारण प्रवासाचे असू शकते, तर कधी स्वतःच्या लग्नामुळे किंवा काही महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिला त्यांची मासिक पाळी काही कालावधीसाठी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात. आता मासिक पाळीला विलंब करणाऱ्या औषधांच्या (pills) मदतीने ती थांबवणे अथवा पुढे ढकलणे खूप सोपे झाले आहे. त्या गोळ्यांच्या मदतीने काही महत्वपूर्ण गंभीर दिवसांमध्ये मासिक पाळी तात्पुरती पुढे ढकलता येऊ शकते. मात्र अशा गोळ्या घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आणि गोळी घेण्याच्या प्रक्रियेबद्दल चर्चा करणे खूप महत्वाचे ठरते, जेणेकरून कोणतीही जोखीम अथवा धोका (effects of pills) निर्माण होणार नाही.

मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या पिल्सची प्रक्रिया –

हे सुद्धा वाचा

मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्यांमध्ये नॉरथिस्टेरॉन असते, जो प्रोजेस्टेरॉनचा कृत्रिम प्रकार आहे. ज्यामुळे शरीरात प्रोजेस्टेरॉनची कृत्रिमरित्या उच्च पातळी राखली जाते व मासिक पाळीला विलंब होतो. परंतु गर्भाशयाचे जाड अस्तर किती काळ टिकवून ठेवता येईल यालाही काही मर्यादा आहे, तरीही या औषधांचा वापर करून मासिक पाळी सुमारे दोन आठवडे पुढे ढकलणे शक्य आहे.

त्या घेणे तुम्ही कधी सुरू करू शकता ?

तज्ञांच्या सांगण्यानुसार, मासिक पाळी सुरू होण्याच्या तीन दिवस आधी गोळ्या घेणे सुरू करावे आणि जोपर्यंत तुम्हाला तुमची मासिक पाळी लांबवायची आहे, तोपर्यंत डॉक्टरांनी सांगितल्यानुसार दररोज गोळ्या घेणे सुरू ठेवावे. या गोळ्यांचे सेवन बंद केल्यानंतर एका आठवड्याच्या आता पुढे ढकललेली मासिक पाळी सुरू होईल.

मासिक पाळी पुढे ढकलणारी औषधे सुरक्षित आहेत की नाहीत ?

मासिक पाळी पुढे ढकलणारी ही औषधे पूर्णपणे सुरक्षित असू शकत नाही आणि त्या गोळ्या घेण्यापूर्वी तज्ञांशी अथवा तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे अत्यावश्यक आहे. मात्र ज्यांना तातडीने प्रवास करायचा आहे किंवा पाळी पुढे ढकलून एखादे लग्न अथवा समारंभ यांचा पूर्णपणे आनंद घ्यायचा आहे, तेव्हा या गोळ्या खरोखर अतिशय उपयुक्त ठरतात. पण या औषधांचा वारंवार वापर केल्याने शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात, ज्यामुळे मासिक पाळीत अडथळा येऊ शकतो, हेही लक्षात ठेवले पाहिजे.

या गोळ्यांचे काही प्रतिकूल परिणाम म्हणजेच दुष्परिणामही आहेत. पण प्रत्येक स्त्रीला समान दुष्परिणाम जाणवतील याची खात्री नाही. या औषधांचा वापर केल्याने आरोग्याशी निगडीत काही समस्या उद्बवण्याची शक्यता असू शकते. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय या गोळ्यांचे सेवन करू नये.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.