वेट लॉस करणाऱ्यांची बल्ले बल्ले… आता पिझ्झा खाऊनही होऊ शकता तुम्ही स्लिम ट्रीम

आहार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पिझ्झा खाऊनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. हे जंक फूड आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासात कशी मदत करते ते जाणून घेऊया.

वेट लॉस करणाऱ्यांची बल्ले बल्ले... आता पिझ्झा खाऊनही होऊ शकता तुम्ही स्लिम ट्रीम
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 9:46 AM

नवी दिल्ली : वजन कमी (weight loss) करणं हे काही खायचं काम नाही… उलट या प्रवासात खाणं थोडं कमीच करावं लागतं. अनेक आवडते पदार्थ सोडणं, कॅलरीज कमी करणं, हेल्दी खाणं या सगळ्याचा त्यामध्ये समावेश होतो म्हणूनच अनेक लोकांना ते पूर्णपणे फॉलो करणं कठीणही वाटतं. वजन कमी करताना कॅलरी (calories) मेंटेन करणे फार महत्वाचे आहे. याशिवाय बर्गर, पिझ्झा असे सर्व जंक फूडही टाळावे लागतात. अनेकजण आपली फिगर टिकवण्यासाठी जिममध्ये खूप घाम गाळतात. पण आपल्यापैकी बहुतांश लोकांचा आवडता पदार्थ असलेला पिझ्झा (pizza) हाही वजन कमी करण्यास मदत करू शकतो, हे तुम्हाला कोणी सांगितलं तर खरं वाटेल का ? कारण ही गोष्टच तशी आहे.

वजन कमी करण्यात सॅच्युरेटेड फॅट आणि जास्त कॅलरी असलेला पिझ्झा कसा प्रभावी ठरेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ? आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पिझ्झा खाऊनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. हे जंक फूड आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासात कशी मदत करते ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

पिझ्झामुळे वेट लॉस कसा ?

आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पिझ्झा खाल्ल्यानेही वजन कमी करता येते. पण त्यासाठी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्ही पिझ्झा किती वेळा खाता आणि तो किती खाता याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. यासाठी तुम्ही लहान आकाराचा पिझ्झा निवडू शकता किंवा तुमच्याकडे मोठा पिझ्झा असल्यास तो इतरांसोबत शेअर करू शकता. तसेच पिझ्झा क्रस्टसाठी तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा क्रस्ट वापरू शकता. ते खाल्ल्याने कॅलरीज तर कमी होतीलच पण त्यामुळे तुम्हाला तुम्हाला फायबर आणि इतर सर्व प्रकारची पोषक तत्वही मिळतील.

याशिवाय पिझाच्या टॉपिंग्जमध्ये तुम्ही सिमला मिरची, मशरूम, कांदा, पालक, टोमॅटो यांसारख्या भाज्या घालून त्याचा पोषक घटक वाढवू शकता व कॅलरीज कमी ठेवून तो आरोग्यदायी बनवू शकता. आहारतज्ञांच्या मते पिझ्झा हेल्दी घटकांनीच बनवावा. पिझ्झा टॉपमध्ये जास्त फॅट असलेल्या गोष्टींऐवजी तुम्ही पोषक तत्वांनी युक्त असलेले पदार्थ ठेवू शकता.

किती वेळा खावा पिझ्झा ?

पिझ्झा माफक प्रमाणात खाल्ला पाहिजे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तोच तुमचा मुख्य आहार आहे, असे समजून तो वारंवार आणि भरपूर खाऊ नका. आहार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि संपूर्ण धान्य यांसारख्या अनेक गोष्टींचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे. तसेच रोजच्या जीवनात नियमितपणे व्यायामाचा समावेश केल्याने तुम्हाला कॅलरी बर्न होण्यास मदत होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.