डोळे वारंवार होतात कोरडे ? खराब खाण्यापिण्याचा असू शकतो परिणाम, तज्ज्ञ काय सांगतात ?
खाण्यापिण्याच्या योग्य सवयींच्या मदतीने डोळ्यांचा कोरडेपणा कमी करता येऊ शकतो. ते पदार्थ कोणते, हेही जाणून घेऊया.
नवी दिल्ली : आजकाल बऱ्याच लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्या सतावतात. डोळ्यांना खाज येणे, जळजळ होणे तसेच डोळे कोरडे होणे ( dry eyes) अशी तक्रार अनेक लोक करताना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपली धकाधकीची आणि अनियमित जीवनशैली आहे. स्क्रीनवर (using screen too much) तासनतास घालवणे, रात्रभर फोनवर चित्रपट पाहणे किंवा रात्री उशिरापर्यंत काम करणे अशा सवयींमुळे डोळ्यांवर ताण तर पडतोच पण त्यासोबतच डोळ्यांच्या समस्यांमध्येही वाढ होताना दिसते.
या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहिल्या, पण आपल्या खाण्या-पिण्याचाही डोळ्यांवर परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का ? हो, हे खरं आहे. बऱ्याच वेळेस आपण असे काही पदार्थ खातो, ज्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ते पदार्थ कोणते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
उच्च साखरयुक्त पदार्थ (High Sugar Foods)
अती साखरयुक्त पदार्थ खाणे हे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. रिफाइंड साखरेचे सेवन केल्याने शरीरातील रक्त आणि ऑक्सिजन सर्क्युलेशन प्रभावित होते. ऑक्सिजनचा प्रवाह बिघडल्याने डोळे कोरडे होऊ लागता. अनेक वेळा असे देखील आढळून आले आहे की जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांत पुरेसे अश्रू येत नाहीत. एवढेच नाही तर अश्रू तयार झाले तरी त्यात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असू शकते. अशी स्थिती दीर्घकाळ राहिल्यास डोळ्यांतील कोरडेपणा वाढू शकतो.
हाय-सोडिअम स्नॅक्स (High-Sodium Snacks)
हाय सोडिअम असलेले पदार्थ हे आपल्या शरीरातील नैसर्गिक पाण्याची पातळी कमी करू शकतात. सॉल्टेड नट्स, वेफर्स आणि चिप्स यासारख्या पदार्थांचा हाय सोडिअम स्नॅक्समध्ये समावेश होतो. असे स्नॅक्स खाल्ल्याने शरीरातील पाणी कमी होते आणि लगेच तहान लागते. त्याचा परिणाम डोळ्यांवरही होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात हाय सोडियमयुक्त स्नॅक्स घेत असाल तर त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. आहारातून असे स्नॅक्स काढून टाकणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
मद्यपान किंवा मद्ययुक्त पेय (Alcohol based Drinks)
डोळे कोरडे होण्यामागे दारू हे सर्वात मोठे कारण मानले जाते. जेव्हा तुम्ही भरपूर मद्य पीता किंवा मद्याचे प्रमाण जास्त असलेले पेय सेवन करता तेव्हा त्याचा तुमच्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. मद्य प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात पाणी कमी होते आणि डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. खूप जास्त दारू प्यायाल्याने डोळ्यातील ओलावा हळूहळू कमी होत जातो. तसेच डोळ्यात अश्रू निर्माण होण्याची प्रक्रिया प्रभावित होते. जर तुम्ही दररोज मद्यपान करत असाल तर शरीरा हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी काय करावे ?
– डोळे बऱ्याचा दिवसांपासून कोरडे होत असतील तर डॉक्टरांना भेटून योग्य उपाय करावेत.
– स्क्रीनचा वापर कमीत कमी करता. टीव्ही असो किंवा मोबाईल, थोड्या वेळाने ब्रेक घेऊन थोडा वेळ चालावे.
– भरपूर पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता कधीच भासणार नाही नये. प्रत्येकाने दिवसातून किमान 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
– कोरडेपणामुळे डोळ्यांना खूप त्रास होत असेल तर थंड कापडाची पट्टी डोळ्यांवर ठेवावी. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.