Birth Control Side Effects : गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे काय होतात दुष्परिणाम? प्रजनन क्षमतेवर होतो का परिणाम? जाणून घ्या सर्व काही…

नको असलेल्या गर्भधारणेपासून वाचण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या वापरणे ही स्त्रियांसाठी सध्या एक सामान्य बाब बनली आहे. बाजारातही या गोळ्या सहज उपलब्ध असतात. पण त्याचे सतत सेवन योग्य आहे का ?

Birth Control Side Effects : गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे काय होतात दुष्परिणाम? प्रजनन क्षमतेवर होतो का परिणाम? जाणून घ्या सर्व काही...
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 1:40 PM

नवी दिल्ली – बर्थ कंट्रोल पिल्स (Birth conrtrol pills) अथवा गर्भनिरोधक गोळ्या याबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत, ज्यावर त्या डोळे झाकून (सहज) विश्वास ठेवतात. काही महिलांना असं वाटतं की त्यांनी जास्त प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तर त्यांना वंध्यत्व येईल व त्यांना पुन्हा कधीही गर्भधारणा होणार नाही. तसेच या गोळ्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने हार्मोनल असंतुलन (hormonal imbalance) होते असेही अनेक लोकांना वाटते. गर्भधारणेशी (pregnancy) संबंधित मिथक आणि नेमकं सत्य काय आहे, याबद्दल तज्ज्ञांनी काय सांगितले आहे, त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

1) जास्त गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने वंध्यत्व येऊ शकते का ?

गर्भनिरोधक औषधांचा वापर केल्यामुळे वंध्यत्व येते हा एक गैरसमज आहे. स्त्रियांच्या शरीरात अंडी तयार करणे थांबवणे, केवळ एवढेच गर्भनिरोधक गोळ्यांचे काम आहे. त्यामुळेच गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे वंध्यत्व येते हा एक मोठा गैरसमज आहे. यामुळे कोणत्याही महिलेला अजिबात वंध्यत्व येत नाही. खरंतर गर्भनिरोधक गोळ्या या अतिशय उत्तम गर्भनिरोधक असल्यामुळे नको असलेली गर्भधारणा टाळता येते.

हे सुद्धा वाचा

2) गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव किती काळ टिकतो ?

एखादी स्त्री जितका काळ या गोळ्या घेईल, तेवढाच वेळ या औषधाचा परिणाम टिकतो. ज्या क्षणी महिलेने ही (गर्भनिरोधक) गोळी घेणे थांबवले, त्याच क्षणी या गोळीचे शरीरातील परिणामही संपुष्टात येतात. त्यामुळेच स्त्रीच्या शरीरात अंडी पुन्हा तयार होतात व त्या महिलेची प्रजनन क्षमता पूर्ववत होते.

3) गर्भनिरोधक गोळी घेणे बंद केल्यावर महिला कधी गरोदर राहू शकते ?

गर्भनिरोधक गोळीचे सेवन करणे बंद केल्यानंतर पहिल्या महिन्यातच गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय, त्यासाठी महिलेची मासिक पाळीही नियमितपणे येणे आवश्यक असते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.