मध (Honey) हा अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट असतो. त्यामध्ये अनेक पोषक तत्वे (Nutrition) असतात. ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून (Health Problems) आपले संरक्षण करण्याचे कार्य करतात. मधाचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळल्याने वजन कमी होण्यासही मदत होते, असे म्हणतात. मध हा त्वचेसाठीही चांगला ठरतो. मधामध्ये कॉपर, आयर्न (लोह), फॉस्फोरस, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम सारखी तत्वे असतात.
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. तुम्ही एक चमचा मध दूध किंवा पाण्यासह सेवन करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी मध खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया.
रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्याने खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो. मधात ॲंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे कफ दूर होण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध पाण्यासोबत सेवन करावा.
मधामध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असताात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात. मधामुळे संसर्गापासून बचाव होतो. हे फायदे हवे असतील तर रात्री झोपण्यापूर्वी दुधासह एक चमचा मधाचे सेववन करावे. त्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.
मधामुळे त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करू शकता. मध आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे कार्य करतो. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते. तसेच तुमचा रंगही उजळतो.
मधात ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे केसांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. मधाचे सेवन केल्याने केस लवकर वाढवतात. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मधाचे सेवन करावे. तसेच मधापासून तयार केलेला हेअर मास्कही तुम्ही केसांसाठी वापरू शकता.
मधामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते असे म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह मधाचे सेवन तुम्ही करू शकता. त्यामुळे चरबी कमी होते. अशा प्रकारे मधाचे सेवन केल्यास जलदरित्या वजन कमी होण्यास मदत होते.
घसा खवखवण्याचा त्रास होत असेल तर ती समस्या दूर करण्यासाठी एक चमचा मधात आल्याचा थोडा रस मिसळून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. यामुळे घशातील खवखव कमी होईल व तुम्हाला आराम मिळेल.