या लाडूचा केवळ आपल्या चवीवरच नव्हे तर आपल्या परंपरा आणि संस्कृतीवरही खोलवर परिणाम झाला आहे. लाडूचा प्रत्येक दाणा आपल्या इतिहासाशी जोडलेला आहे. चला तर जाणून घेऊया या मधुर गोडाचा उगम कसा झाला आणि तो प्रत्येक भारतीयाच्या उत्सवाचा अविभाज्य भाग कसा बनला.
लाडूचा खूप जुना इतिहास आहे. जगातील पहिला लाडू भारतात बनवला गेला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लाडू कोणत्याही मिठाईवाल्याने तयार केला नाही. तर एक प्रसिद्ध डॉक्टर सुश्रुत यांनी तयार केला आहे. त्यावेळी ते रुग्णांना औषध म्हणून लाडू देत असत. त्याकाळी लाडूचा वापर गोड म्हणून न करता औषध म्हणून केला जात असे.
इतिहास आणि आयुर्वेदीक ग्रंथातून मिळालेल्या माहितीनुसार लाडूचा शोध प्रसिद्ध डॉ. सुश्रुत यांनी लावला होता. त्याकाळी तीळ, गुळ, मध, शेंगदाणे आणि इतर सुक्या मेव्याचे मिश्रण तयार करून लाडू तयार केले जात होते. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असे त्यांना ते औषध म्हणून दिल्या जात होते. हा लाडू बनवण्यासाठी औषधे, जडीबुटी, संसर्गापासून बचाव करणारे पदार्थ आणि मध यांचे मिश्रण करून ते तयार केले जात होते. आयुर्वेदामध्ये तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने शक्ती वाढते आणि शरीर गरम होते असे सांगितले आहे. विशेषतः हिवाळ्यात तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा आणि ऊब मिळते.
काही ऐतिहासिक कागदपत्रानुसार चोल राजघराण्यातील सैनिक जेव्हा युद्धासाठी बाहेर पडत तेव्हा ते शुभेच्छा म्हणून त्यांच्यासोबत लाडू घेऊन जात असत. बदलत्या काळानुसार लाडूही बदलले आणि त्यात गुळ ऐवजी साखर वापरली जाऊ लागली. काही शतकांपूर्वी कन्नड साहित्यात आणि सुमारे दशकांपूर्वी बिहारमध्ये एक महत्त्वाचा खाद्यपदार्थ म्हणून लाडूचा उल्लेख आहे. तिथे एक मिठाई तयार केली जायची त्यामध्ये बेसना पासून बनवलेली बुंदी वापरली जायची.
भारताच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारचे लाडू बनवले जातात. उत्तर भारतात बेसनाचे लाडू, दक्षिणेत रवा लाडू, महाराष्ट्रात तिळाचे लाडू आणि बंगालमध्ये नारळाचे लाडू असे प्रकार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक प्रदेशातील चव आणि पदार्थांमधील फरक याला आणखीन खास बनवतो. या लाडूंनी आंतरराष्ट्रीय मिठाच्या यादीतही आपले स्थान निर्माण केले आहे.
कालांतराने लोक त्यांच्या आवडीनुसार लाडू बनवू लागले आणि आज तुम्हाला अनेक प्रकारचे लाडू खायला मिळतात. तर हा होता लाडूंचा इतिहास. आता जेव्हा तुम्ही कोणाला लाडू खायला द्याल तेव्हा त्यांना लाडू देण्याआधी त्याचा इतिहास सांगायला अजिबात विसरू नका.