तुम्हालाही सतत होतो का बद्धकोष्ठतेचा त्रास ? अहो , प्रतिकारशक्ती होईल ना कमी, मग पडाल वारंवार आजारी; आजपासूनच घ्या नीट काळजी

Constipation Effects on Body : जेव्हा एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या असते तेव्हा शरीर कचरा किंवा टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास असमर्थ असते. दीर्घकालीन बद्धकोष्ठतमुळे शरीराची अनेक प्रकारे हानी होऊ शकते.

तुम्हालाही सतत होतो का बद्धकोष्ठतेचा त्रास ? अहो , प्रतिकारशक्ती होईल ना कमी,  मग पडाल वारंवार आजारी; आजपासूनच घ्या नीट काळजी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 10:06 AM

नवी दिल्ली : आजकाल बहुतेक लोक बद्धकोष्ठतेच्या (Constipation) समस्येने त्रस्त असतात. जेव्हा एखाद्याला बद्धकोष्ठतेची समस्या असते तेव्हा शरीर कचरा किंवा टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास असमर्थ असते. कधीकधी बद्धकोष्ठतेचा त्रास एक किंवा दोन दिवस टिकतो आणि नंतर बरा होतो. ही समस्या अतिशय सामान्य (common problem) असून आपल्यापैकी अनेक लोकांना याला तोंड द्यावे लागते. मात्र काही लोकांना जुनाट बद्धकोष्ठतेची (chronic Constipation) समस्या असते, जी गंभीर असू शकते. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमध्ये, आतड्याची हालचाल अत्यंत कमी होते, जी अनेक आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकते. जेव्हा एखादी व्यक्ती आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळेस मलत्याग करते तेव्हा त्याला बद्धकोष्ठता समस्या म्हणतात.

दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे शरीरावर काय नकारात्मक परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊया.

बद्धकोष्ठतेची लक्षणे

हे सुद्धा वाचा

– मल कडक असणे

– आठवड्यात तीनपेक्षा कमी वेळा मलत्याग करणे

– कठीण मल

– मलत्याग करताना जोर लावावा लागणे

– गुदाशयात अडथळे आल्यासारखे वाटणे ज्यामुळे आतड्याची हालचाल थांबते

– पोट नीट रिकामे झाले नाही असे वाटणे

– मलत्याग करताना हातांनी पोटावर दाब द्यावा लागणे

बद्धकोष्ठतेचे शरीरावर होणारेदुष्परिणाम

थकवा जाणवणे

एका रिपोर्टनुसार, तुम्हाला बद्धकोष्ठतेमुळे थकवा येण्याची समस्या असू शकते. बद्धकोष्ठतेमुळे होणारे डिस्बिओसिस कार्बोहायड्रेट्समध्ये फर्मेंटेशन आणि दुर्गंधीयुक्त हायड्रोजन सल्फाइडसह विविध वायूंचे उत्पादन वाढवते. यामुळे मायटोकॉन्ड्रियाचे बिघडलेले कार्य होते. हे पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते आणि थकवा जाणवतो.

बद्धकोष्ठतेमुळे वाढू शकते वजन

जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर त्यामुळे वजनही वाढू शकते. जेव्हा तुम्ही मलत्याग करता तेव्हा शरीरात हार्मोन असंतुलन देखील होते. विशेषतः, इस्ट्रोजेनशी संबंधित असंतुलन असलेल्या लोकांमध्ये लठ्ठपणाशी त्याचा संबंध जोडला गेला आहे.

त्वचेचे होते नुकसान

बद्धकोष्ठतेशी संबंधित विषारीपणामुळे त्वचेला देखील नुकसान होते. यामुळे मुरुमे आणि त्वचेची समस्या वाढू शकते. जेव्हा विष आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याऐवजी कोलनद्वारे रक्तप्रवाहात परत शोषले जातात तेव्हा असे होते. रक्तप्रवाहातील हे विषारी पदार्थ शरीरातील सर्वात मोठा डिटॉक्सिफिकेशन अवयव असणाऱ्या त्वचेतून बाहेर पडू शकतात. आणखी एक यंत्रणा ज्याद्वारे बद्धकोष्ठतेचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो, ती म्हणजे आतड्यांतील बॅक्टेरियातील बदल.

रोगप्रतिकारशक्ती होते कमकुवत

इंटेस्टाइनल फ्लोरा हे शरीराच्या बहुतेक रोगप्रतिकारक प्रतिसादासाठी जबाबदार आहे, ज्यामध्ये कचरा पेशी, विषाणू, बॅक्टेरिया आणि कर्करोगाच्या पेशी काढून टाकणे समाविष्ट आहे. बद्धकोष्ठतेमुळे इंटेस्टाइनल फ्लोरा किंवा बॅक्टेरिया खराब होत असल्याने त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. बद्धकोष्ठतेमुळे विषारी पदार्थ तयार होतात आणि जळजळ होते, ज्यामुळे प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) देखील होऊ शकते.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.