Happiness Tips : भीती, चिंता आणि तणाव यामध्ये नेमका काय फरक आहे ? जाणून घ्या माहिती आणि आनंदी राहण्याचे मार्गही..

आजकाल बदलत्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोक सतत अनेक मानसिक समस्यांना बळी पडतात. भीती, चिंता किंवा तणाव याही अशा काही समस्या आहेत. लोक सहसा या तिनही भावना समान मानतात, पण प्रत्यक्षात तिघेही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत.

Happiness Tips : भीती, चिंता आणि तणाव यामध्ये नेमका काय फरक आहे ?  जाणून घ्या माहिती आणि आनंदी राहण्याचे मार्गही..
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 7:38 AM

नवी दिल्ली : आपल्या प्रत्येक भावनेशी (feelings) एक ऊर्जा निगडित असते. मात्र त्या भावना व्यक्त न केल्याने, मनात दडपून राहिल्यास ते शरीराला आजारी बनवते. आज बहुतेक रोगांचे हेच कारण आहे. तसं पहायला गेलं तर आनंदी राहण्याचे (being happy) रहस्यही यातच दडलेले आहे. अनेकदा लोक भीती, चिंता किंवा तणाव यांना समान समजतात. पण त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर या तिनही भावना अतिशय वेगळ्या आहेत, हे लक्षात घ्या. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमुळे तणाव (stress) निर्माण होत नाही. तुम्हाला कशाची तरी भीती वाटते. आणि त्याच्या कल्पनेने तुम्हाला त्रास होऊ लागला तर काळजी वाटते.

तणाव म्हणजे काय ?

जेव्हा काळजी खरोखरच समोर येते, तेव्हा ती तुम्हाला पुढे कशी सोडवायची, याचा तुमच्यावर ताण येऊ लागतो. जसे परीक्षार्थी किंवा विद्यार्थी परीक्षेची काळजी करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पनांमुळे तो स्वत:ला भीतीच्या वर्तुळात अडकवून ठेवतो. पण परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका सोडवताना उत्तर येत नाही, तेव्हा तो घाबरतो. परीक्षा देऊन तो बाहेर पडला तर निकाल आणि त्यानंतरची परिस्थिती याचा त्याला ताण येऊ लागतो.

हे सुद्धा वाचा

भावना व्यक्त करणे जरूरी

काही लोकांना दीर्घकाळ तणावाखाली राहून या पातळीच्या अनुभवाची सवय होते. त्यांना तणाव आहे हे ते मान्यही करू शकत नाही. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्लाही घेत नाहीत. हीच गोष्ट त्यांना सूक्ष्म मार्गाने आतून त्रास देत राहते आणि रोगांच्या रूपाने प्रकट होते. ऊर्जा आपल्याला भावना व्यक्त करण्यास प्रवृत्त करते. पण जर तुम्ही भावना दडपल्या किंवा काही कारणास्तव तुम्ही त्या दाबून ठेवल्या तर ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्यक्त होते. तुमच्या हावभावाने किंवा शारीरिक व्याधी, मानसिक व्याधींच्या रूपाने ते बाहेर पडताना दिसते. तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकला नाहीत तर ती बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत राहतात.

खरंतर भावनांचे दडपण हे आजारांचे प्रमुख कारण बनले आहे. आजकाल उच्च रक्तदाब, नैराश्य, चिंता यांसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. या सगळ्यांमुळे तुमच्या आयुष्यातून आनंद नाहीसा झाला आहे. आनंद मिळवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करणे. म्हणूनच तुमच्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग शोधा. काही छोट्या-छोट्या उपायांच्या मदतीने तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकता.

– कृतज्ञता व्यक्त करा. ते मनाने अनुभवण्याचा सराव करा.

– क्षमा केल्याने मनातील कटुता निघून जाते. यात स्वतःला क्षमा करणे देखील समाविष्ट आहे.

– काही लोक जंगलात किंवा दूरच्या टेकडीवर जातात आणि मोठ्याने ओरडतात, स्वतःशी बोलतात. त्यानेही फायदा होऊ शकतो.

– आपले विचार नातेवाईक आणि मित्रांसोबत बोलून पहा, तुम्हाला मोकळं वाटू शकेल.

– डायरी लिहिण्याची सवय असेल तर मनात दडपलेल्या भावनांचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल.

– तुम्हाला मनातील भावना नीट लिहिता येत नसतील थोड्या ओळी लिहा आणि भावना बाहेर येऊ द्या.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.