तुम्हालाही आहे का Earbud वापरण्याची सवय ? कानासाठी ठरेल धोकादायक

कानातला मळ काढण्यासाठी आणि कान स्वच्छ करण्यासाठी बहुतांश लोक इअरबडचा वापर करतात. तुम्हीही इअरबड वापरत असाल तर त्यामुळे काय नुकसान होते हे जाणून घ्या.

तुम्हालाही आहे का Earbud वापरण्याची सवय ? कानासाठी ठरेल धोकादायक
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 11:17 AM

नवी दिल्ली – कान (ears) हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग आहे. अशा परिस्थितीत कानाची विशेष काळजी (ear care) घेणे खूप गरजेचे आहे. बरेच लोक कानाच्या स्वच्छतेबद्दल खूप जागरूक असतात आणि वेळोवेळी कान साफ करत असतात. कानात खाज येत असेल तर किंवा कान स्वच्छ करण्यासाठी अनेक लोक इअरबड्सचा (earbuds) वापर करतात. मात्र हे इअरबड्स आपल्या कानासाठी फार धोकादायक ठरू शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

कानाच्या पडद्याचे होऊ शकते नुकसान

इअरबड्स खूप पातळ असतात, जे सहजपणे तुमच्या कानात जातात. त्यामुळे बहुतांश लोक त्याचा वापर कान स्वच्छ करण्यासाठी करतात. परंतु काहीवेळा साफसफाई करताना, इअरबड कानाच्या जास्त आतमध्ये जाऊन कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. ज्यामुळे आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.

हे सुद्धा वाचा

कानात वेदना होणे

इअरबड्सचा सतत वापर केल्यानेही कान दुखू शकतात. जर तुम्हाला सतत कानदुखीचा त्रास होत असेल तर त्याचे कारण इअरबड्स असू शकतात. खरंतर बहुतेक लोक इअरबड कानात खूप आत घालून कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे कानात वेदना होऊ शकतात. त्यामुळे इअरबड्सचा अतीवापर टाळावा.

कानात मळ साठू शकतो

बऱ्याच वेळेस लोक कानात जमा झालेला मळ (इअरवॅक्स) स्वच्छ करण्यासाठी इअरबड्स वापरतात. पण इअरबड्समुळे हा मळ कानातून बाहेर पडण्याऐवजी आतमध्ये ढकलला जातो. त्यामुळे काही वेळेस इअर वॅक्स ब्लॉकेजची समस्या उद्भवू शकते.

कानातून येऊ शकतो पू

जेव्हा तुम्ही कान स्वच्छ करण्यासाठी इअरबड वापरता, त्यावनेळी कानात वेदना होऊ शकतात तसेच काही दुखापत झाल्यास कानात पू होण्याची समस्या देखील होऊ शकते. खरंतर, चुकीच्या पद्धतीने इअरबड्स वापरणे हे कानासाठी खूप हानिकारक असू शकते, ज्यामुळे तुमच्या कानातून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. त्यामुळे कान स्वच्छ करण्यासाठी इअरबड्स न वापरता डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.