Health Tips : ‘काफी असरदार’ ठरते ‘कॉफी’चे सेवन, या गंभीर रोगांची जोखीम होते कमी

कॉफी हे ताजेतवाने करणारे आणि ऊर्जा वाढवणारे पेय आहे. अनेक लोकांची सकाळी कॉफीशिवाय अधुरी असते. .

Health Tips : 'काफी असरदार' ठरते 'कॉफी'चे सेवन, या गंभीर रोगांची जोखीम होते कमी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 12:42 PM

नवी दिल्ली : कॉफी (coffee) हे ताजेतवाने करणारे आणि ऊर्जा वाढवणारे पेय आहे. अनेक लोकांची सकाळी कॉफीशिवाय अधुरी असते. मात्र अनेक अहवालांमध्ये, कॉफीचे अतिसेवन हानिकारक असल्याचे नमूद केले आहे. कॅफीन (caffeine) नावाचा मुख्य घटक कॉफीमध्ये आढळतो, जो जास्त प्रमाणात सेवन केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. पण योग्य प्रमाणात कॉफी घेतल्यास शरीरासाठी खूप फायदेशीर (benefits of coffee) ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते कॉफीमुळे विविध आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

कॉफीवर केलेल्या काही अभ्यासानुसार, योग्य प्रमाणात कॉफी सेवन केल्यास गंभीर आजारांवर फायदेशीर ठरू शकते. कॉफीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांचे उच्च प्रमाण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कॉफी प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. कॉफी योग्य प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला मिळणारे फायदे जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते कॉफी

2014 च्या एका अभ्यासानुसार, कॉफीच्या सेवनाने लोकांमध्ये टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो. संशोधकांनी 48,000 हून अधिक लोकांच्या डेटाचा अभ्यास केला आणि त्यामध्ये असे आढळले की जे चार वर्षांमध्ये दररोज कमीत कमी एक कप कॉफी पितात त्यांना मधुमेहाचा धोका 11 टक्के कमी असतो. पण मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कॉफीचे सेवन करणे इष्ट ठरते.

कॉफीमुळे लिव्हर कॅन्सरचा धोका कमी होतो

2019 च्या एका अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की कॉफीच्या सेवनाने लिव्हर कॅन्सरचा (यकृत) धोका कमी होऊ शकतो. यापूर्वी 2015 मध्ये, अमेरिकेतील संशोधकांना असेही आढळून आले की दररोज दोन ते तीन कप कॉफीचे सेवन केल्याने सहभागींमध्ये हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आणि क्रॉनिक लिव्हर रोगाचा धोका सुमारे 38 टक्क्यांनी कमी होऊ शकतो

कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो

कॉफीमध्ये आढळणाऱ्या कॅफेनचे योग्य प्रमाणात सेवन करणे देखील फायदेशीर ठरते. कॅफेनचे सेवन केल्याने रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यास फायदा होतो. 2018 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका 15 टक्क्यांनी कमी होतो. संशोधकांनी सांगितले की, दररोज एक ते चार कप कॉफी प्यायल्याने हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होते. मात्र त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते.

कॉफी चरबी कमी करण्यास मदत करते

कॅफेनमुळे शरीरातील चरबी कमी होते. आजकाल फॅट बर्निंग सप्लिमेंट्समध्ये कॅफेन आढळते. कॅफेनमुळे चयापचय दर अर्थात मेटाबॉलिज्म रेट 3-11% वाढू शकते. लठ्ठ लोकांसाठी चरबी कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.