युरीन स्टोनचा त्रास टाळायचा असेल तर उभं राहून नव्हे, अशा रितीने लघवी करणे पुरुषांसाठी फायदेशीर
काही तज्ज्ञांचे असे मत आहे की पुरुषांनी उभे राहण्याऐवजी बसून लघवी केल्यास अनेक फायदे मिळू शकतात.
नवी दिल्ली : पुरूष (men) बहुतांश वेळेस उभे असताना लघवी (urine) करताना दिसतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येही पुरुषांना उभे राहून लघवी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र काही काळापूर्वी एका तज्ञाने पुरुषांना उभे असताना लघवी करण्याबद्दल इशारा दिला होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुरुषांनी उभे राहण्याऐवजी बसून लघवी करावी, त्याचे त्याचे अनेक फायदे (benefits)मिळू शकतात.
नेदरलँड्समधील डॉक्टरांना असे आढळून आले आहे की लघवी करण्यासाठी बसणे हे पुरुषांसाठी, विशेषतः ज्यांना प्रोस्टेटच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण उभं राहण्याऐवजी बसून लघवी जास्त प्रेशरने बाहेर पडते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही उभे राहून लघवी करत असाल तर त्यामुळे तुमच्या ओटीपोटाचे आणि मणक्याचे स्नायू आकुंचन पावतात. 2014 च्या अभ्यासात तज्ञांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून लोक बसून लघवी करत आहेत. डॉक्टरांनी असेही सांगितले की जेव्हा लोक बसतात तेव्हा पेल्विस आणि हिप मसल्सना (नितंबाचे स्नायू) आराम देते, ज्यामुळे लघवी करणे सोपे होते.
यूसीएलए (UCLA)यूरोलॉजी विभागातील सहयोगी क्लिनिकल प्राध्यापक डॉ. जेसी एन. मिल्स म्हणाले की, ज्या लोकांना दीर्घकाळ उभे राहण्यात अडचण येते, त्यांच्यासाठी लघवी करण्यासाठी बसणे हा देखील एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. ते म्हणाले, ‘असे अनेक लोक आहेत ज्यांना असे वाटते की आपले ब्लॅडर (मूत्राशय) पूर्णपणे रिकामे नाही झाले नाही, म्हणून ते बसून लघवी करतात.’
एका वेबसाइटशी बोलताना डॉ मिल्स यांनी सांगितले की, तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुम्ही तुमच्या पोटाच्या स्नायूंचा जास्त वापर करता. अशा प्रकारे बसून लघवी केल्याने तुमचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे होते. तथापि, या संशोधनाचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने लघवी करताना बसणे आवश्यक आहे. लघवी केल्यानंतर तुमचे ब्लॅडर पूर्णपणे रिकामे झाले, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उभे राहूनही लघवी करू शकता. पण जर तुम्हाला तुमचे ब्लॅडर नेहमी भरलेले वाटत असेल तर तुम्ही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
जर तुमचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नसेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात असे एका प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ सल्लागारांनी पूर्वी नमूद केले होते. तुमचे ब्लॅडर योग्यरित्या रिकामे होत नसेल तर यामुळे लघवी टिकून राहते (याला यूरिनरी रिटेंशन देखील म्हणतात) आणि यामुळे संसर्ग किंवा मूत्राशयात खडे होऊ शकतात. संसर्गामुळे सेप्सिस किंवा किडनी संसर्ग होऊ शकतो. अनेकदा तुम्हाला मूत्राशय रिकामे न होण्याची लक्षणे देखील दिसतात, अशा वेळी तुम्ही डॉक्टरांना भेटणे महत्त्वाचे आहे. लघवीचा वेग कमी होणे, लघवीला ताण येणे, थांबून-थांबून लघवी होणे आणि लघवीला वेळ लागणे यांचा त्यात समावेश होतो.
रिस्क फॅक्टर
NHS नुसार, तुम्हाला देखील मूत्राशय पूर्णपणे रिकामे न होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर त्यामुळे मूत्राशयात दगड अथवा स्टोनची समस्या निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांनी सांगितले की, किडनी ही लघवी तयार करण्याचे काम करते. हे पाणी आणि टाकाऊ पदार्थांनी बनलेले असते जे किडनी तुमच्या रक्तापासून वेगळे करतात. युरिया हा टाकाऊ पदार्थांपैकी एक असून तो नायट्रोजन आणि कार्बनपासून तयार होतो. जर तुमच्या मूत्राशयात थोडीशी लघवी उरली असेल तर युरियामध्ये असलेली रसायने एकत्र चिकटून क्रिस्टल्स बनतात. कालांतराने, हे क्रिस्टल्स कठोर होतात, ज्यामुळे मूत्राशयात दगड तयार होतात.