Hiccups Tips: तुम्हालाही वारंवार उचकी लागते का ? हे असू शकते कारण
बऱ्याच वेळेस आपल्याला अचानक उचकी येण्यास सुरूवात होते आणि ती बराच काळ सुरू राहते. काही वेळेस तर अनेक प्रयत्न करूनही बराच वेळ उचकी थांबत नाही.
नवी दिल्ली – बऱ्याच वेळेस आपल्याला अचानक उचकी (Hiccups) येण्यास सुरूवात होते आणि ती बराच काळ सुरू राहते. काही वेळेस तर अनेक प्रयत्न करूनही बराच वेळ (long time) उचकी थांबत नाही. असं म्हटलं जातं की आपली कोणी आठवण काढत असेल तर आपल्याला उचकी लागते, पण असं खरंच होतं का ? खरंतर उचकी येण्यामागे अनेक कारणं (reason for Hiccups) असतातं. खरंच उचकी का येते आणि ती थांबवण्याचे उपाय काय असताता ते जाणून घेऊया.
उचकी येण्याचे कारण
– पटापट खाणे अथवा पेय पिणे
– कार्बोनेटेड पेय पिणे किंवा मद्यपान करणे
– जास्त प्रमाणात खाणे
– तणाव, भय- भीती किंवा उत्साह
– मानेत ताण
– ड्रग्स
– खूप गरम किंवा खूप थंड पेय पिणे
– किमोथेरपी
– विषारी हवेत श्वास घेणे
दोन दिवसांपेक्षा अधिक काळ उचकी येत असेल तर
जर तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक काळ उचकी येत असेल व बराच वेळ उचकी येणे बंद होत नसेल तर हे धोकादायक ठरू शकते. काही वेळेस उचकी काही महिन्यांपर्यंत येऊ शकते त्याला इंट्रॅकेबल (बराच काळ चालणारी उचकी) असे म्हटले जाते. एखादी शारीरिक स्थिती अथवा आजारामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते. उदाहरणार्थ –
– कॅन्सर किंवा ट्यूमर
– स्ट्रोक
– जीईआरडी
– युरेमिया
– न्यूमोनिया
– आतड्याचे रोग
– हेपिटायटिस किंवा लिव्हर कॅन्सर
– ट्युमर किंवा जखम
उचकी दूर करण्याचे उपाय
– बर्फाच्या पाण्याने एक मिनिट गुळण्या कराव्यात.
– बर्फाचा खडा चोखावा.
– पेपरबॅग मध्ये हळूहळू श्वास घ्यावा.
– काही वेळ श्वास रोखून धरावा, यामुळे कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढते.
– वारंवार उचकी येत असेल तर कमी जेवा. कार्बोनेटेड पेय व गॅस होणारे पदार्थ कमी खावेत.