सायकलिंग आवडतं ना ? पण सायकल चालवण्यापूर्वी या चुका अजिबात करू नका, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Avoid these four mistakes before cycling : सायकलिंग करण्यापूर्वी काही नियमांचे पालन केल्यास तुमचा प्रवास सुखकर आणि तेवढाच मजेशीर ठरेल व सायकलिंगचा फायदाही मिळेल.
नवी दिल्ली : सायकल चालवणे (cycling) ही एक चांगली शारीरिक (physical acitvity) क्रिया किंवा व्यायाम आहे हे खरे आहे. नियमित व्यायाम केल्याने, तुम्ही नेहमी तंदुरुस्त राहता. तुमचे वजन नियंत्रित राहते (weight control) आणि स्टॅमिनाही (increases stamina) वाढतो, पण याकल चालवण्यापूर्वी काही चुका झाल्यास तुमचा फायदा होण्याऐवजी नुकसानच करू शकतात, हे तुम्हाला माहित आहे का ? सायकल चालवण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
फॅटी फूड खाणे टाळा
सायकल चालवण्यापूर्वी तुमच्या खाण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात. सायकलिंग करण्यापूर्वी आपण जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. असे अन्न खाल्ल्याने आळस तर येतोच पण ऊर्जाही कमी होते. असे अन्न तुमच्या आतड्यात जास्त काळ राहते, ज्यामुळे सायकलिंगच्या स्पीडवर परिणाम होतो. सायकल चालवल्यानंतर आपल्या शरीराला प्रथिनांची खूप गरज असते. यासाठी तुम्ही भिजवलेले हरभरे देखील घेऊ शकता.
सायकलिंग पूर्वी जास्त पाणी पिणे टाळावे
सायकल चालवण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळावे, असा सल्लाही तज्ज्ञ देतात. बहुतेक लोक सायकल चालवण्यापूर्वी एक किंवा दोन ग्लास पाणी पितात, जे चांगले नाही. कारण तुमचे यकृत एकावेळी मर्यादित पाण्यावर प्रक्रिया करू शकते. तसेच तुम्हाला वारंवार लघवीही लागू शकते. सायकल चालवताना तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही काही घोट पाणी पिऊ शकता. पण जास्त पाणी पिणे टाळावे.
सायकल चालवण्यापूर्वी स्ट्रेचिंगची काळजी घ्या
शारीरिक व्यायामापूर्वी स्ट्रेचिंगची शिफारस केली जाते, परंतु जर तुम्ही ट्रॅकवर सायकल चालवायला जात असाल तर तसे करणे टाळा. कारण सायकल चालवण्यापूर्वी स्ट्रेचिंग केल्याने तुमच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. जर तुम्ही रोड सायकलिंग करत असाल तर 10 ते 20 मिनिटे आधी स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या स्नायूंमध्ये कडकपणा येत नाही.
क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम टाळावा
सायकलस्वाराने निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त शरीराचा आणि स्नायूंचा व्यायाम करणे योग्य नाही. त्याच वेळी, काही लोक आधीच त्यांची सायकल चालवणे सोपे करण्यासाठी गियर सेट करतात, जे टाळले पाहिजे. असे केल्याने दुखापत होण्याचा धोका असतो.