Turmeric Milk Side Effect : गुणकारी हळद-दुधाचे दुष्परिणामही होतात? तुम्हाला माहीत आहेत का ?

हळदीचे दूध हे पारंपारिक भारतीय पेय असून त्याला गोल्डन मिल्क असेही म्हणतात. त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे आजकाल हळद-दूध हे पाश्चिमात्य देशांमध्ये लोकप्रिय होत आहे. पण त्याचे काही दुष्परिणामही होतात.

Turmeric Milk Side Effect : गुणकारी हळद-दुधाचे दुष्परिणामही होतात? तुम्हाला माहीत आहेत का ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 7:45 AM

नवी दिल्ली – हळदीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत आणि ते कोणापासूनही लपलेले नाही. हळदीचे दूध (Turmeric Milk) भारतीय घरांमध्ये वर्षानुवर्षे वापरले जाते. हे पारंपारिक भारतीय पेय असून त्याला गोल्डन मिल्क (golden milk) असेही म्हणतात. त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे आजकाल हळद-दूध हे पाश्चिमात्य देशांमध्येही लोकप्रिय होत आहे. आपल्या स्वयंपाकात हळदीचा वापर तर आपण (फोडणीद्वारे) करतोच पण त्याव्यतिरिक्त आपल्या आहारात हळद समाविष्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हळदीचे दूध पिणे. दुधात हळद टाकून हे हेल्दी पेय बनवले जाते. हळदीतील अँटीऑक्सिडंट (anti-oxidant) आणि दाहक-विरोधी गुणधर्म तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात. हळदीचे दूध श्वासोच्छवासाच्या समस्या, यकृताच्या समस्या, जळजळ आणि पाचन समस्यांवर देखील मदत करू शकते. पण ते पिण्याचे काही दुष्परिणामही होतात, हे तुम्हाला माहीत आहे का ?

हळदीचे दूध पिण्याचे दुष्परिणाम –

किडनी स्टोनचा त्रास वाढवू शकते

हे सुद्धा वाचा

हळदीमध्ये 2% ऑक्सलेट असते. उच्च डोसमध्ये, त्यामुळे अतिसंवेदनशील व्यक्तींमध्ये किडनी स्टोन निर्माण होऊ शकतो किंवा किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे, तुम्हाला किडनीची समस्या असल्यास हळद घातलेले दूध पिणे टाळावे.

लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते

ज्या लोकांना अशक्तपणा आहे, अशा लोकांनी हळदीचे दूध पिऊ नये. हळदीचे दूध शरीरात जाऊन जलद लोह शोषण्याचे काम करते. यामुळे शरीरात लोहाचा अभाव अधिक होतो आणि अशक्तपणाची समस्या वाढते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात लोह न खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता होऊ शकते.

रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते

या संदर्भात अद्याप प्रत्यक्ष फारसे संशोधन झालेले नाही, पण काही पुरावे असे सूचित करतात की जर हळदीचे दूध मधुमेहविरोधी औषधासोबत घेतले तर ते रक्तातील साखरेची पातळी खूप कमी करू शकते. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर हळदीचे दूध पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

यकृताशी संबंधित समस्या वाढू शकते

तसेच यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असलेल्या लोकांनी तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कधीही हळदीचे दूध पिऊ नये. अशा लोकांसाठी, हळदीचे दूध एक ट्रिगर म्हणून काम करते आणि त्यांची समस्या वाढवू शकते.

गर्भवती महिलांसाठी ठरू शकते धोकादायक

याशिवाय गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिऊ नये. हळदीचे दूध पोटातील उष्णता वाढवते. अशा परिस्थितीत गर्भाशयाचे आकुंचन, रक्तस्त्राव किंवा गर्भाशयात क्रॅम्पची समस्या निर्माण होऊ शकते. हळदीच्या दुधामुळे पहिल्या तीन ते चार महिन्यांत गर्भपात होण्याचा धोकाही वाढतो.

पित्ताशयाचा त्रास वाढण्याची शक्यता

तसेच पित्ताशयाशी संबंधित काही समस्या असल्यास किंवा पित्ताशयामध्ये दगड असल्यास तुम्ही हळदीचे दूध पिऊ नये. यामुळे तुमची समस्या आणखीन वाढण्याची शक्यता असते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.