Cornflakes Side Effects : तुम्हीही खाता का कॉर्नफ्लेक्स… त्याचे हे दुष्परिणाम माहीत आहेत का ? या रुग्णांनी करू नये कॉर्नफ्लेक्सचे सेवन
कॉर्नफ्लेक्स सामान्यतः मक्यापासून तयार केले जातात. त्यात कोणतेही पदार्थ न टाकल्यास त्याचे अनेक फायदे मिळतातस, कॉर्नफ्लेक्सची चव वाढवण्यासाठी त्यात अनेक गोष्टी टाकल्या जातात, ज्यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचते.
![Cornflakes Side Effects : तुम्हीही खाता का कॉर्नफ्लेक्स... त्याचे हे दुष्परिणाम माहीत आहेत का ? या रुग्णांनी करू नये कॉर्नफ्लेक्सचे सेवन Cornflakes Side Effects : तुम्हीही खाता का कॉर्नफ्लेक्स... त्याचे हे दुष्परिणाम माहीत आहेत का ? या रुग्णांनी करू नये कॉर्नफ्लेक्सचे सेवन](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/02/03140944/cornflakes-1.jpg?w=1280)
नवी दिल्ली – आधुनिक जीवनशैलीत आपल्या खाण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. आजकाल तिन्ही वेळेस अन्न शिजवायला सर्वांनाच वेळ मिळतो असे नाही. लोकांना रेडीमेड पदार्थ (readymade food) जास्त आवडू लागल्या आहेत. त्यामुळेच आजकाल सकाळी नाश्त्यात कॉर्नफ्लेक्स (Cornflakes) घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. लोक सकाळी दुधात कॉर्नफ्लेक्स मिसळून खातात. जर कॉर्नफ्लेक्स फक्त मक्याच्या पिठापासून बनवलेले असतील तर त्यात काही नुकसान नाही, पण ते चविष्ट लागावेत यासाठी त्यामध्ये अनेक गोष्टी मिक्स केल्या जातात, त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक (Side Effects) ठरू शकतात.
कॉर्नफ्लेक्सची चव वाढावी यासाठी त्यात स्ट्रॉबेरी, मिश्र फळे, बदाम आणि मध घातला जातो. एवढ्याही गोष्टी घातल्या तरी त्यामध्ये फॅट कमी असते, पण त्यामध्ये साखर आणि मीठ टाकून त्यावर प्रक्रिया केली तर ते आपल्या आरोग्यासाठी वाईट ठरते.
लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/18221119/Health-75.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/06/12212208/Cornflakes-breakfast.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/12/31182232/life-1-n-compressed.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/08/04232147/food-3.jpg)
कॉर्नफ्लेक्समध्ये पोषक तत्वांची कमतरता असते आणि त्यामध्ये फायबर देखील कमी असते. त्यामुळे भूक भागत नाही. कॉर्नफ्लेक्स खाल्ल्यानंतर लोकांना लवकर भूक लागते. यासोबतच कॉर्नफ्लेक्स हे आरोग्य आणि हृदयासाठीही फारसे चांगले नाही. ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनने असेही म्हटले आहे की कॉर्नफ्लेक्स, जेव्हा संपूर्ण धान्य म्हणून एकटेच खाल्ले जाते तेव्हा तो पोषणासाठी योग्य पर्याय ठरत नाही. त्याच्यासोबत सकाळी फळांचे सेवन करावे.
तर अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही प्रोसेस्ड फूड घेत असाल तर त्याचे अनेक तोटे होतात. त्यामुळे कॅन्सरचा धोकाही वाढतो. एका संशोधनानुसार, ॲडेड फॅट्सबी, साखर आणि सोडिअम घालून कोणताही पदार्थ चविष्ट तर बनवता येतो, पण ते काही आरोग्यदायी ठरत नाही. त्यामुळे लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय नाही
तज्ज्ञांच्या मतानुसार, साखरेचे प्रमाण वाढल्याने उच्च रक्तदाब, जळजळ, मधुमेह, फॅटी लिव्हर डिसीज आणि लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. या कारणामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकता (पक्षाघात) धोका नेहमीच असतो. कॉर्नफ्लेक्सचा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स 82 पेक्षा जास्त असल्याने, मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय ठरत नाही.