हायला… हे वाचलंत का ? नाकात बोटं घालाल तर होईल केमिकल लोचा, कसं काय बुवा ?
तुम्हालाही नाकात बोट घालायची सवय आहे का? या सवयीचा फटका मेंदूलाही सहन करावा लागू शकतो आणि हे एका अभ्यासातून समोर आले आहे. कसे ते जाणून घ्या..
नवी दिल्ली : काही लोकांना नाकात बोट घालायची (nose picking) इतकी सवय असते की ते लोकांसमोरही हे कृत्य करण्याची चूक करतात. यामुळे अनेकवेळा लाज वाटते, पण तरीही लोकांची ही सवय काही सुटत नाही. याला rhinotillexomania असेही म्हणतात, काही जण एकटे असताना नाकात बोटं घालतात तर काही जण सर्वांसमोर हे करतात. पण या वाईट सवयीचा आपल्या मेंदूच्या आरोग्यावरही (effect on brain health) परिणाम होतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? एका संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, नाकात बोट घालण्याच्या सवयीमुळे अल्झायमरचा (Alzheimer) गंभीर आजार होऊ शकतो.
आता हे वाचून तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडेल की नाकात बोट घातल्याने विस्मरण कसे होऊ शकते? पण हे खरं आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठात उंदरांवर केलेल्या संशोधनात हा परिणाम समोर आला आहे. हा अभ्यास 2022 मध्ये पूर्ण झाला आणि क्लॅमिडीया न्यूमोनिया बॅक्टेरियावर संशोधन करण्यात आले. या बॅक्टेरियामुळे न्यूमोनिया होतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की या जीवाणूमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. तो बॅक्टेरिया नाकातून थेट मेंदूपर्यंत जाो शकते आणि मेंदूमध्ये जाऊन अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश सारखे आजार होण्यास कारणीभूत ठरू शकते. तसेच या जीवाणूमुळे मज्जातंतूंचा संसर्गही होऊ शकतो.
बॅक्टेरियाचा हल्ला रोखणारे अमायलोइड प्रोटीनही या काळात मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होते. ग्रिफिथ युनिव्हर्सिटीचे न्यूरोसायंटिस्ट जेम्स सेंट जॉन म्हणतात की क्लॅमिडीया न्यूमोनिया थेट नाक आणि मेंदूपर्यंत जाऊ शकतो हे आपण यापूर्वी पाहिले आहेच. यामुळे शरीरात अल्झायमरसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
संशोधकांच्या मते, नाकात बोट घालण्याच्या सवयीमुळे आतील थर सोलवटला जाऊ शकतो. अशा स्थितीत बॅक्टेरिया मेंदूपर्यंत पोहोचू शकतात आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर अल्झायमरची सुरुवात देखील होऊ शकते.
सेंट जॉन या संशोधकाच्या सांगण्यानुसार, हा अभ्यास आपल्याला माणसांवरही करायचा आहे आणि ही प्रोसेस अशीच फॉलो करावी, अशी आमची इच्छा आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की हा जीवाणू मानवांमध्ये (उपस्थित) आहे, परंतु ते मानवापर्यंत कसे पोहोचले हे शोधू शकले नाहीत.