Dry Eyes Problem : तुमचेही डोळे कोरडे पडत आहेत का ? हवामान बदलामुळे होऊ शकतो त्रास, अशी घ्या काळजी

बदलत्या ऋतुमानाचा परिणाम आपले शरीर तसेच डोळ्यांवरही होताना दिसतो. काही वेळा डोळे कोरडे पडण्याची समस्या उद्भवते, त्यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेऊया.

Dry Eyes Problem : तुमचेही डोळे कोरडे पडत आहेत का ? हवामान बदलामुळे होऊ शकतो त्रास, अशी घ्या काळजी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 8:36 AM

नवी दिल्ली – हवामान बदलले की त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम (effect on body of change in weather) होतो. रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा आणि केसांवर (effect on skin and hair) त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. त्याच वेळी, हवामानातील बदलांमुळे डोळ्यांवर खूप परिणाम होतो, ज्यामुळे संसर्ग, डोळ्यांमध्ये जळजळ आणि इतर प्रकारच्या (dry eye problems) समस्या उद्भवू शकतात. अशीच एक डोळ्यांची समस्या म्हणजे कोरडे डोळे, हा त्रास हिवाळ्यात जास्त वाढतो. थंड-कोरडे वारे आणि हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव अशा परिस्थितीमुळे डोळ्यांना जळजळ आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

तसेच हिवाळ्यात वापरल्या जाणाऱ्या रूम हिटरमुळेही डोळे कोरडे पडण्याची समस्याही वाढू शकते. अशा परिस्थितीत जे लोक आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घेत नाहीत, त्यांना कोरड्या डोळ्यांचा त्रास होण्याची भीती जास्त असते. त्याचप्रमाणे, जेव्हा हवामानात थंडी कमी होऊ लागते आणि उष्णता वाढू लागते, तेव्हाही डोळ्यांना संसर्ग आणि डोळे कोरडे होण्याची समस्या वाढू शकते.

डोळे कोरडे पडत असल्यास अशी घ्या काळजी

हे सुद्धा वाचा

बदलत्या ऋतूत कोरड्या डोळ्यांची समस्या टाळण्यासाठी काय करावे आणि या समस्येवर उपचार कसे करावे ते जाणून घेऊया.

हिटर काळजीपूर्वक वापरा

थंडीपासून शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी बहुतेक लोक रूम हिटरचा वापर करतात. पण, हिटरमधून गरम आणि कोरडी हवा बाहेर पडल्याने डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो. म्हणूनच, हिटर वापरताना, त्याची गरम हवा थेट डोळ्यांवर पडू नये हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे, हिटरपासून थोड्या लांब अंतरावर झोपा किंवा बसा जेणेकरून तुमचे शरीर त्याच्या हवेच्या कमी संपर्कात येईल.

डोळ्यांना वारंवार हात लावू नका

डोळ्यांमध्ये जळजळ आणि संसर्ग झाला असेल तर लोकं डोळे सारखे चोळतात किंवा त्यांना सारखा स्पर्श करतात. पण, असे केल्याने डोळ्यांना झालेला संसर्ग वाढू शकतो. म्हणूनच डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळा आणि डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल.

थोड्या-थोड्या वेळाने प्या पाणी

थंडीत लोकांना तहान कमी लागते आणि त्यामुळे लोक कमी पाणी पितात. कमी पाणी प्यायल्याने संसर्ग बरा होण्यास वेळ लागतो. त्याचबरोबर डिहायड्रेशनमुळे डोळे कोरडे पडण्याची समस्या वाढू शकते.

आपल्या डोळ्यांचे संरक्षण करा

कोरड्या डोळ्यांची समस्या असल्यास सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि धुळीपासून डोळ्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिवाळ्यात उन्हाचा कडाका नसला तरी अशा हवामानात गॉगल किंवा चष्मा घाला आणि गरजेनुसार स्कार्फ आणि टोपीचाही वापर करावा. गाडी चालवताना, उद्यानात किंवा बाहेर ट्रेकिंगला जाताना आणि घरातून बाहेर पडताना सनग्लासेस किंवा चष्मा यांचा अवश्य वापर करावा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.