पाळीव प्राण्यांमुळे एकटेपणा होतो दूर, मूड सुधारतो, आहेत अनेक फायदे

घरात पाळीव प्राणी आणल्याने जबाबदारी तर वाढते पण त्यामुळे आपल्याला अनेक शारीरिक व मानसिक फायदे मिळतात.

पाळीव प्राण्यांमुळे एकटेपणा होतो दूर, मूड सुधारतो, आहेत अनेक फायदे
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 4:43 PM

नवी दिल्ली – घरात एखादा पाळीव प्राणी (pet animal) असेल तर आपली जबाबदारी खूप वाढते कारण एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे बरेच लोक इच्छा असूनही घरात प्राणी पाळत नाहीत. पण आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, घरात पाळीव प्राणी असेल तर मनुष्याच्या आयुष्यावर आणि आरोग्यावरही (good effect on health) चांगला प्रभाव पडतो तसेच व्यक्तीचे शारीरिक व मानसिक (mental health) आरोग्य सुधारते.

आजकाल कामामुळे अनेक लोक शहरात एकटे राहतात. त्यामुळे त्यांची एकटेपणाची भावना वाढते आणि तणावही येतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरी कुत्रा, मांजर किंवा ससा यांसारखे पाळीव प्राणी आणू शकता. त्यांच्यामुळे मिळणारे फायदे जाणून घेऊया.

निरोगी रक्तदाब

हे सुद्धा वाचा

सर्व पाळीव प्राणी मालकांसाठी ही चांगली बातमी आहे. अनेक आरोग्य अहवाल असे सूचित करतात की पाळीव प्राण्यांच्या आसपास राहिल्यामुळे हृदयाचे आरोग्य वाढवू शकते. पाळीव प्राण्यांसोबत राहिल्याने मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो.

शारीरिक हालचाल वाढते

पाळीव प्राणी खूप सक्रिय असतात, त्यामुळे आपल्या दैनंदिन शारीरिक हालचालींना प्रोत्साहन मिळते. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली करणे खूप महत्वाचे आहे, यासाठी पाळीव प्राणी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

एकटेपणा होतो दूर

जे लोक कामानिमित्त घरापासून आणि कुटुंबापासून दूर राहतात त्यांच्यासाठी पाळीव प्राणी घरी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरात कोणतेही पाळीव प्राणी असल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते आणि एकटेपणा जाणवत नाही.

शरीरातील हॅपी हार्मोन्स वाढतात

एका अहवालानुसार, पाळीव प्राण्यांच्या आसपास राहिल्याने शरीरातील कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनचे उत्पादन कमी होते. आणि ऑक्सीटॉसिन व एंड्रोफिन या हॅपी हार्मोन्सचे उत्पादन वाढते. कुत्रा किंवा मांजरीसोबत राहण्यामुळे तणाव, चिंता, डिप्रेशन (नैराश्य) आणि एकटेपणा दूर होतो.

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

पाळीव प्राणी भावनिक आणि सामाजिक संबंध वाढवतात. तुमचा मूड चांगला होतो, ज्यामुळे एकूणच आरोग्याला चालना मिळते. पाळीव प्राण्यांमुळे एखाद्या व्यक्तीची भावनिक स्थिरता सुधारते आणि तणाव कमी करण्यास मदत होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.