उन्हाळ्यात डायबिटीज वाढतो, हे तुम्हाला माहिती आहे का?; ‘असा’ करा डायबिटीज मॅनेज

उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांना गरमीमुळे थकवा आणि हीट स्ट्रोकचा धोका असतो. अशा परिस्थितीत मधुमेह मॅनेज करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.

उन्हाळ्यात डायबिटीज वाढतो, हे तुम्हाला माहिती आहे का?; 'असा' करा डायबिटीज मॅनेज
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 3:12 PM

नवी दिल्ली : आजकाल मधुमेह (Diabetes)  ही एक कॉमन समस्या झाली आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना वारंवार भूक अथवा तहान लागू शकते, त्यामुळे त्यांनी योग्य डाएटचे पालन केले पाहिजे. मधुमेहाचे दोन प्रकार असतात – टाइप 1 आणि टाइप 2. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी प्रत्येक ऋतू हा नवं आव्हान घेऊन येतो. ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांच्या शरीरातून पाणी (water) वेगाने निघून जाऊ शकते. कारण हाय शुगर असल्याने त्यांना वारंवार लघवी लागू शकते. यामुळे मधुमेहाचे रुग्ण डिहायड्रेशनचे (dehydration) बळी होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, उन्हाळ्यात्या ऋतूमध्ये मधुमेह अथवा डायबिटीज मॅनेज करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टिप्सचे पालन करणे फायदेशीर ठरू शकते.

उन्हाळ्यात मधुमेह कसा मॅनेज करावा ?

हे सुद्धा वाचा

ॲक्टिव्ह रहा

उन्हाळ्यात मधुमेह मॅनेज करायचा असेल तर ॲक्टिव्ह राहणे महत्वाचे आहे. हे सर्वात उत्तम ठरते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी अथवा संध्याकाळी किमान अर्धा तास चालण्याचा प्रयत्न करा. तसेच जेवणानंतर 1 ते 3 तासांनंतर चालणे ही अतिशय योग्य वेळ आहे.

फायबर युक्त पदार्थ खा

मधुमेह ग्रस्त लोकांनी हाय फायबर डाएट घेतले पाहिजे. ज्या पदार्थांमध्ये फायबर जास्त असते ते पचन स्लो करते आणि ब्लड शुगर स्पाइक्स थांबवते. असे पदार्थ खाण्याने वजन कमी होण्यासही मदत होते. ओट्स , ब्राऊन राइस, फळं, सुकामेवा, भाज्या यांचा त्यात समावेश होतो.

गोड पेय पिणे टाळावे

उन्हाळ्यात फ्रेश वाटावं म्हणून अनेक लोकं फ्रेश ज्यूस किंवा स्मूदी पिणं पसंत करतात. मात्र ज्यूस हे फायबर समृद्ध नसतात व त्यात नैसर्गिक साखर जास्त असल्यावे ग्लूकोज लेव्हल वाढू शकते, हे मधुमेहग्रस्तांनी लक्षात ठेवावे.

हायड्रेटेड रहावे

शरीरातील अतिरिक्त साखर काढण्यास मदत करण्यासाठी किडनीला जास्त लघवी तयार करणे गरजेचे असते. पाणी प्यायल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत मिळू शकते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड रहावे.

शुगर लेव्हल चेक करत रहावी

टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज शुगर लेव्हल चेक करणे महत्वाचे ठरते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.