तुम्हालाही टॉयलेटमध्ये मोकळं होण्यास लागतो तासन् तास वेळ ? बद्धकोष्ठता नेमकी का होते ?
बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना होतो, लवकर पोटही साफ होत नाही. मात्र बद्धकोष्ठता नेमकी का होते व त्यावर उपाय काय आहेत ते समजून घेऊ.
नवी दिल्ली : अमिताभ बच्चन व दीपिका पडूकोण यांचा ‘पीकू’ हा गाजलेला चित्रपट तर तुम्हाला माहीत असेलच ! या चित्रपटात अमिताभ यांना बद्धकोष्ठतेचा त्रास झाल्याचे दाखवण्यात आले आहे. ज्या दिवशी त्यांची ही समस्या सुटते, त्याच दिवशी त्यांचा मृत्यू होतो, असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. जणू काही त्याच दिवसाची ते वाट बघत होते. ही सीन जरी फिल्मी असला तरी त्यातून हे नक्कीच दिसून येतं की (बद्धकोष्ठतेची) ही (constipation) समस्या किती मोठी आहे. खरंतर पोट न साफ होण्याचा (stomach problem) हा त्रास असा आहे, ज्याबद्दल लोक नीट मोकळेपणाने बोलण्यास कचरतात. पण आजच्या शहरी जीवनशैलीत (busy lifestyle) ही समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत, बद्धकोष्ठता का होते, ती कशी टाळावी आणि हा त्रास झाल्यास काय करावे? ते समजून घेऊया.
काय आहेत बद्धकोष्ठतेची लक्षणे ?
जर तुम्ही आठवड्यातून तीन पेक्षा कमी वेळा मलत्याग करत असाल तर ही बद्धकोष्ठता असू शकते. सकाळी मलविसर्जनात अडचण येत असेल तर ते बद्धकोष्ठतेचे लक्षण असू शकते. श्वासाची दुर्गंधी, डोकेदुखी, पोटात गॅस, पोट फुगणे, भूक न लागणे, अपचन, अस्वस्थता, पोटात दुखणे, शौचास जाऊनही पोट साफ न होणे, ही सर्व बद्धकोष्ठतेची लक्षणे असू शकतात.
बद्धकोष्ठता का होते ?
– शरीरात पाण्याची कमतरता
– शारीरिक श्रम किंवा व्यायामाचा अभाव
– वृद्धत्व
– तळलेले, मसालेदार अन्नाचे अतिसेवन
– रात्री उशिरा झोपणे
– अन्नात फायबरयुक्त पदार्थांचा अभाव
– मैद्याच्या पदार्थांचे जास्त सेवन
– जेवणाची वेळ निश्चित नसणे
– खूप चहा किंवा कॉफी पिणे
– टेन्शन
– गरजेपेक्षा कमी अन्न खाणे
– भूक लागल्याशिवाय खात राहणे
– न चावता खाणे
– जास्त मांसाहार
– काही औषधांचे सेवन
बद्धकोष्ठता न होण्यासाठी उपाय कोणते ?
– पुरेसे पाणी प्यावे.
– नियमित व्यायाम करावा.
– वेळेवर मलविसर्जन करा
– फायबरयुक्त पदार्थ खा
– जेवणाच्या अर्धा तास आधी आणि नंतर कोमट पाणी प्या
– आले आणि मध पाण्यात मिसळून प्यावे.
– लिंबूपाणी प्या
– भेंडी खा
– अंजीर खा
– रोज एक आवळा खा
– भोपळ्याच्या बिया खा
– कोरफड
– मनुका खा
– ताक प्यावे
– अळशीच्या बिया खाव्यात.