एका चुकीमुळे होऊ शकतो पाइल्स व फिशरचा त्रास, वेळीच बदला लाईफस्टाईल अन्यथा करावा लागेल पश्चाताप
आजकाल अतिशय कॉमन समस्या असलेल्या बद्धकोष्ठतेचा अनेकांना सामना करावा लागतो. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. त्याकडे दीर्घकाळ लक्ष न दिल्यास ते अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते.
नवी दिल्ली : आजकाल बद्धकोष्ठतेची (constipation) समस्या खूप कॉमन झाली असून प्रत्येक चौथ्या-पाचव्या व्यक्तीला हा त्रास होतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येशी झगडणारे लोक आपल्या घरात किंवा अगदी जवळपास सहज सापडतील. सहसा बद्धकोष्ठता हा आजार मानला जात नाही आणि म्हणूनच लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण जर दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठतेचा (chronic constipation) त्रास जाणवत असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरते. दीर्घकालीन बद्धकोष्ठता अनेक गंभीर समस्यांना (health problems) कारणीभूत ठरू शकते, ज्यापासून मुक्तता मिळवणे नंतर अत्यंत कठीण होत जाते.
आपल्यापैकी बहुतांश लोकांनी कधी ना कधी बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना केला असेल. बर्याच वेळा जड अन्न खाल्ल्यानंतर हा त्रास होतो. हे फारसे काळजी करण्यासारखे नसले तरी बद्धकोष्ठता शरीरात कायम राहिल्यास वेळीच सावध होऊन काळजी घेणे आवश्यक ठरते. बद्धकोष्ठता दूर न करण्याची छोटीशी चूक मोठ्या आजारांना कारणीभूत ठरू शकते. दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता झाल्यास मूळव्याध, फिशर सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
दीर्घ बद्धकोष्ठतेमुळे होतो मूळव्याध, फिशरचा त्रास
बद्धकोष्ठतेची समस्या हलके घेणे आपले शरीर व आरोग्य यासाठी खूप जड जाऊ शकते. त्यासंदर्भात वेळीच पुरेशी काळजी न घेतल्यास त्याचे रूपांतर दीर्घकालीन बद्धकोष्ठतेत होते आणि त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. बद्धकोष्ठतेमुळे होणाऱ्या आजारांमध्ये मूळव्याध, फिशर यांचाही समावेश होतो. हे आजार खूप वेदनादायक होतात आणि त्यामुळे रुग्णाला उठणे आणि बसणेही खूपच कठीण होते.
पाइल्स (Hemorrhoids) – बद्धकोष्ठतेमुळे मलप्रवाह नीट होत नाही आणि त्यामुळे मलत्याग करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत गुदद्वाराच्या आसपासच्या नसांना सूज येऊ शकते आणि ते मूळव्याधाचे कारण बनते. या आजारात रुग्णाला असह्य वेदना सहन कराव्या लागतात.
फिशर (Fissure) – दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठतेमुळे होणारा रोग म्हणजे फिशर. मूळव्याधाप्रमाणेच फिशर हा देखील अतिशय वेदनादायक आजार आहे. या आजारात गुद्द्वाराची जागा फाटते आणि मलत्याग करताना त्या व्यक्तीला अतिशय वेदना होतात. अशा स्थितीत त्याचा त्रास बराच काळ सुरू राहतो आणि रुग्णाला उठणे-बसणे कठीण होते.
या कारणांमुळे होतो दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास
– वृद्धत्व
– शरीरात दीर्घकाळ निर्जलीकरण होते
– कमी फायबर असलेले अन्न खाणे
– शारीरिक काम अथवा हालचाल न करणे
– बराच काळ आराम करणे
– इतर कोणत्याही रोगाच्या औषधांमुळे
डिप्रेशन, अथवा ईटिंग डिसऑर्डमुळे
बद्धकोष्ठता दूर करण्याचे उपाय
– शेंगा, भाज्या, फळे, संपूर्ण धान्य यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात नियमित समावेश करा.
– प्रक्रिया केलेले पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस उत्पादनांपासून लांब रहा.
– दिवसभरात भरपूर पाणी प्या, हायड्रेटेड रहा.