Kangaroo Care : कांगारू केअर म्हणजे काय ? आई आणि नवजात बाळाला कसा होतो फायदा ? जाणून घ्या सर्वकाही
आजकाल कांगारू केअरची सेवा जवळपास सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असते. हा एक नैसर्गिक उपचार आहे. पण हे नेमकं काय आहे, त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
नवी दिल्ली – जेव्हा एखाद्या कुटुंबात नवजात सदस्याचे, लहान बाळाचे (birth of baby) आगमन होते तो क्षण प्रत्येकासाठी खास असतो. या क्षणासाठी अनेक जण खूप वेळ वाट बघत असतात. आईसाठी तर हा क्षण अतिशय महत्वपूर्ण आणि भावनिकही असतो. नऊ महिने बाळाला पोटात वाढवताना आई त्याची खूप काळजी घेत असते. यामुळे बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकासही (physical and mental growth) योग्य रितीने होत असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार गर्भावस्थेप्रमाणेच जन्मानंतरही बाळाची खूप (baby care) काळजी घ्यावी लागते. त्यात थोडासाही निष्काळजीपणा झाल्यास बाळाला इन्फेक्शन अथवा एखादा आजार होऊ शकतो.
विशेषत: मुदतपूर्व प्रसूतीमुळे म्हणजेच प्रीमॅच्युअर डिलीव्हरीमुळे बाळाच्या आरोग्यासंदर्भात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशी मुले दुधाचे योग्य सेवन करू शकत नाहीत आणि निरोगीही राहू शकत नाहीत. तर प्रीमॅच्युअर डिलीव्हरीमुळे आईच्या स्तनांमध्ये दूध तयार होत नाही. नवजात बाळासाठी आईचे दूध खूप महत्वाचे आहे. नवजात बाळाला फक्त आईचे जाड पिवळे दूध देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. प्रीमॅच्युअर डिलीव्हरी आणि नवजात बाळास येणाऱ्या इतर समस्या दूर करण्यासाठी ‘कांगारू केअर’ची मदत घेतली जाते. कांगारू केअर म्हणजे काय आणि त्याचा बाळ व आईला कसा फायदा होतो ते जाणून घेऊया…
कांगारू केअर म्हणजे काय ?
आजकाल ‘कांगारू केअर’ची सेवा जवळपास सर्वच लहान-मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. तो एक नैसर्गिक उपाय आहे. यामध्ये मादी अथवा स्त्रीला कांगारूप्रमाणे आपल्या बाळाला छातीजवळ ठेवावे लागते. सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘कांगारू केअर’ पद्धतीत आई आपल्या मुलाला छातीजवळ ठेवते. या काळात आई आपल्या मुलाची पूर्ण काळजी घेते. वैद्यकीय व्यवहारात याला ‘स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट’ (skin to skin contact) म्हणतात. हे मुलाचे संरक्षण करते. डॉक्टरांच्या मते, सामान्य प्रसूतीच्या तुलनेत प्रीमॅच्युअर डिलीव्हरीची मुलं अशक्त असतात. त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत असते, तसेच त्यांचे वजनही कमी होते. कांगारू केअर या तंत्राद्वारे मुलावर उपचार केले जातात. मात्र, ‘कांगारू केअर’चा अवलंब डॉक्टरांच्या देखरेखीखालीच केलेला उत्तम ठरतो.
कांगारू केअरचे फायदे
‘कांगारू केअर’ पद्धती अंतर्गत आई बाळाला जास्त काळ स्तनपान करू शकते. त्याच वेळी, बाळही स्तनपान करण्यास देखील शिकते. जेव्हा जेव्हा बाळाला भूक लागते, ते स्तनपान करते. यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा पूर्ण विकास होतो. यासोबतच मुलाचे विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते. तर आईला आत्म-समाधान म्हणजेच मानसिक आनंद मिळतो.