शार्क टँकच्या जजना आला पॅनिक ॲटॅक, तासभर होत्या अस्वस्थ; जाणून घ्या काय असतो हा त्रास ?

एखादी व्यक्ती कधीही कुठेही आजारी पडू शकते. पॅनिक ॲटॅक देखील एक अशी समस्या आहे, ज्याची वेळ आणि ठिकाण निश्चित नाही. ही समस्या टाळण्यासाठी, त्याच्या लक्षणांची योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

शार्क टँकच्या जजना आला पॅनिक ॲटॅक, तासभर होत्या अस्वस्थ; जाणून घ्या काय असतो हा त्रास ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 8:09 AM

नवी दिल्ली : खराब लाइफस्टाईल, धावपळीचे जीवन आणि ताणतणाव (stress) , हे हानिकारक घटक आजच्या जीवनात आजारांची प्रमुख कारणे बनली आहेत. या कारणांमुळे अनेक लोकांना उच्च रक्तदाब, ब्लड शुगरचा त्रास होत आहे. एवढेच नव्हे तर काही लोक मानसिक आजारीही (effect on mental health) होत आहेत. पॅनिक ॲटॅक (panic attack) हा ही भावनांशी संबंधित आजार आहे. शार्क टँक इंडिया सीझन-2 या शोमधील एक जज असणाऱ्या विनीत सिंह हिलाही नुकताच पॅनिक ॲटॅकचा सामना करावा लागला होता. विनीता यांनी सोशल मीडियावर याबद्दलचा अनुभव शेअर केला होता. ट्रायथलॉनमध्ये स्विमींग करताना त्यांना पॅनिक ॲटॅक आला होता व त्या तासभर अस्वस्थ होत्या.

या पार्श्वभूमीवर या आजाराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पॅनिक ॲटॅक म्हणजे काय, याची पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यावर वेळेवर उपचार करता येऊ शकतील.

हे सुद्धा वाचा

पॅनिक ॲटॅक म्हणजे नक्की काय ?

एखाद्या व्यक्तीला पॅनिक ॲटॅक हा कधीही, कुठेही होऊ शकतो. हे त्या व्यक्तीच्या स्थितीवर आणि त्याच्या भावनांवर अवलंबून असते. जर ती व्यक्ती जास्त घाबरलेली रहात असेल तर हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. पिढ्यानपिढ्या कुटुंबात हा आजार सुरू असेल तर तुम्हीही त्याला बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. वारंवार पॅनिक ॲटॅक मुळे न्यूरोलॉजिकल बदल दिसून येतात. त्याचा हृदय आणि मन या दोन्हींवर परिणाम होतो.

पॅनिक ॲटॅकची लक्षणे काय आहेत ?

इतर आजारांप्रमाणेच पॅनिक ॲटॅकची देखील काही लक्षणे दिसून येतात. मूर्च्छित होणे, भीती वाटणे, धडधडणे, गुदमरल्यासारखे वाटणे, संपूर्ण शरीर थरथरल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे आणि अस्वस्थता, हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे जाणवणे, वेगाने श्वास घेणे, उलट्या होणे आणि लूज मोशन ही समस्येची लक्षणे दिसू शकतात.

का येतो पॅनिक ॲटॅक ?

पॅनिक ॲटॅक येण्यामागे काही कारणे देखील समाविष्ट आहेत. यामागे अनुवांशिक कारणे असू शकतात, म्हणजेच हा आजार पिढ्यानपिढ्या सुरू असू शकतो. खूप तणाव आणि भीतीची परिस्थिती निर्माण झाली तरी हा त्रास होऊ शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीला कुठलाही फोबिया असेल तर किंवा एखादी व्यक्ती भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील असेल तर त्यांना पॅनिक ॲटॅक येण्याची शक्यता अधिक असते. जे लोक एखाद्या गोष्टीचा जास्त ताण घेतात त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो.

बचावासाठी काय करावे ?

पॅनिक ॲटॅकची लक्षणे दिसू लागल्यास दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत रहा. आत्मविश्वास अजिबात गमावू नका. ही फक्त तात्पुरती फेज आहे, हे स्वतःला पटवून द्या. आपले डोळे बंद करा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. समस्या वाढत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.