Dos and Don’ts During Periods: मासिक पाळीच्या काळात ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, मात्र ‘या’ गोष्टी करणे कटाक्षाने टाळा
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना वेगळा अनुभव येऊ शकतो. कोणाला खूप त्रास होतो तर काहींना बिलकुल वेदना होत नाहीत. या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करणे टाळावे हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली – पीरिएड्स म्हणजे म्हणजे मासिक पाळीच्या (periods) हा महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. मुलगी वयात आली की तिला (Menstrual cycle) मासिक पाळी सुरु होते. दर महिन्यात चार ते पाच दिवस रक्तस्त्राव होतो. ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये महिलांच्या शरीरातून यौवनापासून रजोनिवृत्तीपर्यंत दर महिन्याला गर्भाशयाच्या अस्तरातून रक्त आणि इतर पदार्थ बाहेर टाकले जातात. तज्ज्ञांच्या मते, स्त्रीच्या संपूर्ण आयुष्यातील सुमारे सात वर्षे मासिक पाळीत जातात. बहुतेक महिलांसाठी हा काळ त्रासदायक (pain) असतो.
अनेकींना वेगळे अनुभव येऊ शकतात. कोणाला खूप त्रास होतो तर काहींना बिलकुल वेदना होत नाहीत. काही महिलांना क्रॅम्प्स, मूड स्विंग आणि ब्लोटिंगचा सामना करावा लागू शकतो. पण ही एक नैसर्गिक आणि गरजेची प्रक्रिया असून मासिक पाळी येणं ही चांगली बाब असते. म्हणूनच, महिन्याच्या या काही दिवसांमध्ये प्रत्येक स्त्रीने काय करावे आणि काय करू नये हे माहीत असणे फार महत्वाचे असते.
मासिक पाळी दरम्यान काय करावे ?
मासिक पाळीचा प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असून शकतो. साधारणत: मासिक पाळी ही दोन ते दिवसांपर्यंत असू शकते. या काळात काय काळजी घ्यावी हे जाणून घ्यावे.
हायड्रेटेड रहावे : पीरियड्स दरम्यान डिहायड्रेशन, डोकेदुखी आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी शक्य तितके पाणी किंवा द्रवपदार्थांचे सेवन करावे.
व्यायाम करावा : व्यायाम केल्याने केवळ तणाव टाळता येत नाही तर हॅपी हार्मोन्स पण उत्सर्जित होतात. क्रॅम्प्समुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी व्यायाम केल्याने मदत होऊ शकते. यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे.
स्वच्छतेची काळजी घ्यावी : मासिक पाळीच्या काळात संसर्ग व्हायचा धोका वाढतो, त्यामुळे या काळात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. दररोज अंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावेत आणि सॅनिटरी नॅपकिन्स काही तासांनी बदलत रहावे.
योग्य आहार घ्यावा : मासिक पाळीत विविध पदार्थ खायचे क्रेव्हिंग वाढते. पण पौष्टिक व सकस आहार घेतल्यास या काळात होणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो. अधिक फळे आणि भाज्या खाव्यात. थकवा कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच पुरेशी विश्रांती घ्यावी.
मासिक पाळी दरम्यान काय करू नये ?
– जंक फूड व कॉफीचे अतिरिक्त सेवन करणे टाळावे.
– मदयपान करू नये
– अस्वच्छ सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर टाळा.