वर्कआऊटपूर्वी आणि वर्कआऊटनंतर कसे असावे डाएट ? जाणून घ्या माहिती

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी काही न खाता वर्कआऊट करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही थोडं पाणी पिऊन वर्कआऊट करू शकता.

वर्कआऊटपूर्वी आणि वर्कआऊटनंतर कसे असावे डाएट ? जाणून घ्या माहिती
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 10:18 AM

नवी दिल्ली – साधरणत: वर्कआऊट (workout) किंवा व्यायाम करण्यापूर्वी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचे उत्तम कॉम्बिनेशन असलेले पदार्थ खावेत, ते फायदेशीर ठरते, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ (health expert) देतात. या दोन्ही पदार्थांमुळे मसल्स आणि एनर्जी निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. वर्कआउट करण्यापूर्वी फायबर आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. या गोष्टींचे सेवन केल्याने पोटदुखी किंवा पेटके येणे, असा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत,पॉवर वॉक करण्या आधी किंवा जिमला जाण्याआधी आधी काय खावे (what to eat before workout), असा प्रश्न पडला असेल तर माहिती जाणून घेऊया.

असा बनवा वर्कआऊट डाएट प्लॅन

जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सकाळी वर्कआउट करायचे असेल तर सकाळी काही खाऊन नये, थोडं पाणी पिऊन वर्कआऊट करणे चांगलं ठरतं. असं केल्याने, शरीरात आधीच साठवलेल्या कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न होण्यास सक्षम होतील आणि तुम्ही वजन कमी करू शकाल. संशोधनात असेही आढळून आले आहे की सकाळी वजन कमी करण्याची ही पद्धत खूप यशस्वी आहे. पण जर तुम्ही जड व्यायाम (heavy exercise) करणार असाल तर काही स्नॅक्स जरूर खावेत.

हे सुद्धा वाचा

वर्कआऊट पूर्वी काय खावे ?

र्कआउट करण्याच्या 10 ते 15 मिनिटे आधी तुम्ही सहज पचेल असा, कार्बोहायड्रेट्सने भरलेला नाश्ता घेऊ शकता. उदाहरणार्थ, केळी, ड्राय सेलेरी, काही द्राक्षे इत्यादी पदार्थ खाऊ शकता. तसेच वर्कआउट करण्यापूर्वी एक कप कॉफी चांगली ऊर्जा देण्यासाठी देखील प्रभावी ठरेल.

दुपारच्या जेवणानंतर वर्कआऊट डाएट प्लॅन

जर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर वर्कआऊट अथवा व्यायाम करत असाल तर तुम्हाला वर्कआउटच्या आधी स्नॅक्स घेण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला भूक लागली असेल तर व्यायामाच्या अर्धा तास आधी तुम्ही 100 ते 200 कॅलरीज असलेले स्नॅक्स खाऊ शकता. जर तुम्ही कार्डिओ करणार असाल तर तुमच्या स्नॅक्समध्ये जास्त कार्बोहायड्रेट, थोडे प्रोटीन आणि लो फॅट असलेल्या पदार्थांचा समावेश करणे चांगले असते. जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार असाल तर जास्त प्रोटीन, मध्यम (स्वरूपात) कार्बोहायड्रेट आणि लो फॅट आहार खाणे चांगले ठरते.

वर्कआऊटनंतर आहार कसा असावा ?

जर तुम्ही हेव्ही वर्कआऊट किंवा जड व्यायाम करत असाल किंवा तु्म्ही खेळाडू असाल तर वर्कआउटनंतर एका तासाच्या आत प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट खाणे तुमच्यासाठी आदर्श मानले जाते. असे केल्याने, नवीन स्नायू तयार करणे सोपे होते. पण जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी वर्कआउट करत असाल तर वर्कआउटनंतरचा आहार कमी प्रमाणात घ्यावा. खेळाडू 100 ते 300 कॅलरीज असलेले अन्न खाऊ शकतात. यासाठी तुम्ही 10 ग्रॅम प्रथिने आणि त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेऊ शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.