‘या’ 5 पदार्थांमुळे महिला कॅन्सरच्या टेन्शनपासून राहू शकतात मुक्त, डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएट प्लान

कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे, तो वेळेपूर्वी ओळखला नाही तर रुग्णाचा मृत्यू निश्चित आहे. कॅन्सरला अनेक महिलाही बळी पडतात. बहुतेक महिलांचा मृत्यू ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनाच्या कर्करोगाने होतो. कर्करोगाच्या बहुतेक कारणांसाठी माणूस स्वतःच जबाबदार असतो. त्यामुळे महिलांनी आपल्या आहारात सुधारणा केल्यास कॅन्सरच्या अनेक घटना टाळता येतील.

'या' 5 पदार्थांमुळे महिला कॅन्सरच्या टेन्शनपासून राहू शकतात मुक्त, डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएट प्लान
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 1:00 PM

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या (world health organization) सांगण्यानुसार 2020 मध्ये कॅन्सरमुळे एक कोटी लोकांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार, दर 6 पैकी एक मृत्यू कॅन्सरमुळे होतो. यापैकी सर्वाधिक मृत्यू ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनाच्या कर्करोगामुळे होतात. म्हणजेच कर्करोगामुळे महिलांचा सर्वाधिक मृत्यू होतो. स्तनाच्या कर्करोगानंतर (breast cancer) गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळेही (cervical cancer)महिला अधिक चिंतेत असतात. इंडिया अगेन्स्ट कॅन्सरच्या आकडेवारीनुसार, भारतात 27 लाख लोक कॅन्सरवर उपचार घेत आहेत. 2020 मध्ये सुमारे 8.5 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. यामध्ये पहिला क्रमांक स्तनाच्या कर्करोगाचाच होता.

महिलांना कॅन्सरपासून वाचवण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यापासून बचाव करण्यासाठी जनजागृती मोहिमेवर भर देण्यात येत आहे, जेणेकरून महिलांनी वेळीच हे ओळखावे आणि या धोकादायक आजाराला बळी पडू नये. कर्करोगाची अनेक कारणे आहेत, परंतु बहुतेक कारणांसाठी लोक स्वतःच जबाबदार आहेत. ज्येष्ठ आहारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते तेव्हा कॅन्सर आपल्या शरीरावर हल्ला करतो. म्हणूनच महिलांनी आपली जीवनशैली निश्चित करावी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. डॉक्टरांनी महिलांमध्ये कॅन्सर होऊ नये यासाठी आहार योजनेत 5 मौल्यवान पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

कॅन्सरपासून वाचण्यासाठी महिलांनी या 5 गोष्टींचा आहारात समावेश करावा

हे सुद्धा वाचा

1) सॅलड – डॉक्टर सांगतात की, प्रत्येक जेवणात सॅलडचा समावेश केलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या आहारात जितके जास्त फायबर समाविष्ट कराल तितके ते तुमच्यासाठी चांगले असेल. फायबरमुळे तुम्ही खाल्लेल्या इतर वाईट गोष्टींचे पचन मंद होईल.

2) सीड्स – तुमच्या रोजच्या आहारात बिया असलेल्या गोष्टींचा समावेश करा. आजकाल अनेक प्रकारच्या बिया बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही भोपळा, अंबाडीच्या बिया, नाचणी, ज्वारी, बाजरी इत्यादींचा समावेश करू शकता. प्रथिनासोबतच या गोष्टींमध्ये ओमेगा-3 देखील उपलब्ध आहे, जे आपल्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. जर तुम्हाला ते थेट खावेसे वाटत नसेल तर तुम्ही त्या बिया पीठात मिसळून खाऊ शकता.

3) दूध व दुग्धजन्य पदार्थ – रोजच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. प्रत्येक स्त्रीने दररोज दूध, दही, ताक असे काही ना काही खाणे आवश्यक आहे. यातून प्रथिने मिळतील. जर दूध आणि दही मिळत नसेल तर दोन्ही वेळेस डाळी नक्की खाव्यात. बेसनाचाही आहारात समावेश करू शकता. वाटल्यास बेसन पिठाचे धिरडे करून तुम्ही खाऊ शकता.

4) बदाम – महिला सहसा कमी पौष्टिक अन्न खातात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच महिलांनी त्यांच्या रोजच्या आहारात सुक्या मेव्यांचा नक्कीच समावेश करावा. बदाम, अक्रोड, जर्दाळू, सुक्या खजूर, खजूर इत्यादींचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

5) हिरव्या भाज्या आणि आंबट फळं – डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सर्व रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यांचे रोज सेवन केल्याने जवळपास सर्व प्रकारचे आजार टाळता येतात. याशिवाय लिंबूवर्गीय फळे म्हणजेच ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, बेरी, द्राक्षे, संत्री, किवी इत्यादींचे रोज सेवन करा. कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी रोजच्या आहारात लिंबूवर्गीय पदार्थांसह प्रोटीनचा समावेश करा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.