‘औषध’ चांगले परिणाम कधी दाखवतात आणि कधी नाही; जाणून घ्या, औषध घेण्याची योग्य पद्धत!
डॉक्टर रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर औषध का घेण्यास सांगतात? रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर औषधे घ्या, औषध परिणाम दर्शवेल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे न घेतल्यास वेदना कमी होण्याऐवजी वाढू शकतात. साइड इफेक्ट्स देखील होऊ शकतात. जाणून घ्या, औषध घेण्याची योग्य पद्धत कोणती असते.

पोटदुखी, ताप, डोकेदुखी… अशा सर्व समस्यांवर औषधे घेतली जातात. कधी औषध परिणाम (drug effects) दाखवते तर कधी नाही. एखादे औषध कधीतरी कामी येते आणि तेच औषध पुन्हा घेतल्यावर परिणाम होत नाही असे का होते? किंवा खूप हळू काम करते. हे समजून घेण्यासाठी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने संशोधन केले. या प्रश्नाचे उत्तर संशोधनात सापडले आहे. औषध कधी जलद परिणाम (Fast results) दाखवते आणि ते कधी हळू काम करते हे याबाबत संशोधनात माहिती उघड केली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती एखादे औषध घेते तेव्हा ते रक्तात विरघळल्यानंतर (After dissolving in the blood) त्याचा परिणाम दिसून येतो. कोणतेही औषध रक्तात विरघळण्यासाठी पोट आणि आतड्यांमधून जावे लागते. या संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागेल, हे सर्व औषध घेत असताना रुग्णाच्या बसलेल्या किंवा झोपलेल्या स्थितीवर अवलंबून असते.
शरीराची मुद्रा महत्वाची




संशोधकांच्या मते, औषध शरीरात किती लवकर विरघळेल आणि त्याचा परिणाम दाखवेल यासाठी रुग्णाच्या शरीराची मुद्रा जबाबदार असते. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला औषध लवकरात लवकर शरीरात विरघळवून त्याचा परिणाम दाखवायचा असेल, तर रुग्णाने सरळ बसण्याऐवजी उजव्या बाजूला बसणे चांगले.
त्वरीत परिणामासाठी हे करा
संशोधनात सहभागी संशोधक रजत मित्तल यांनी हे समजून घेण्यासाठी पोटाचे यांत्रिक मॉडेल तयार केले. औषधाचा अधिक परिणाम कधी आणि कसा होतो हे मॉडेलच्या माध्यमातून सांगण्यात आले. ते म्हणतात, जेव्हा औषध उजव्या बाजूला झुकून घेतले जाते तेव्हा ते थेट पोटाच्या खोल भागात पोहोचते आणि वेगाने शोषले जाते आणि त्वरीत परिणाम दर्शवते.
औषध झोपून घेऊ नका
संशोधनादरम्यान असे समोर आले की, औषध डाव्या बाजूला बसून किंवा झोपून घेत असताना शरीरातील औषधाचे शोषण कमी होते. त्यामुळे त्याचा प्रभावही कमी झाला. संशोधकांचे म्हणणे आहे की, सरळ बसण्याच्या तुलनेत डावीकडे झुकून औषध घेत असताना, औषधाच्या शोषणाचा वेग 5 पटीने कमी होतो.