Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला अचानक विसरली तिची भाषा अन् रशियन बोलायला लागली, तपासणी केल्यावर समोर आला गंभीर आजार

तीन वेगवेगळ्या ॲक्सेंट म्हणजे उच्चारांमध्ये बोलणारी एक महिला अचानक स्वतःचा ॲक्सेंट विसरली. आणि अचानक रशियन भाषेत बोलायला लागली. तपासणी केली असता गंभीर आजार समोर आला.

महिला अचानक विसरली तिची भाषा अन् रशियन बोलायला लागली, तपासणी केल्यावर समोर आला गंभीर आजार
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 12:17 PM

नवी दिल्ली : आपण आपली भाषा किंवा उच्चार बोलणे विसरून अचानक एखाद्या दुसऱ्या देशाची भाषा (language) बोलण्यास सुरूवात करू , असे कधी होऊ शकते का ? ऐकायला हे थोडं विचित्र वाटेल पण टेक्सासमधील एका महिलेसोबत अगदी असाच प्रकार घडला आहे. तीन वेगवेगळ्या ॲक्सेंट (accent) म्हणजे उच्चारांमध्ये बोलणारी एक महिला अचानक स्वतःचा ॲक्सेंट विसरली. आणि अचानक रशियन (Russian) भाषेत बोलायला लागली. तपासणी केली असता गंभीर आजार समोर आला. विशेष म्हणजे याची तिला जाणीवही नव्हती किंवा रशियन भाषेशी, त्या उच्चारांशी तिचा कधी संबंधही आला नव्हता. मग असे का घडले ?

या महिलेचे नाव ॲबी फेंडर असे असून तिच्यावर नुकतीच हर्निएटेड डिस्क ठीक करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर ही महिला जेव्हा जागी झाली तेव्हा तिचा आवाज आवाज लकवाग्रस्त (बंद) झाला होता आणि तिचा टेक्स्टन ॲक्सेंटही गायब झाला. ही महिला एक पूर्वाश्रमी एक गायिका होती. तिच्या सांगण्यानुसार, तिचा रशियाशी कोणताही संबंध नाही, ती तेथे कधी गेलेलीसुद्धा नाही. हा सर्व प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले होते.

‘फॉरेन ॲक्सेंट सिंड्रोम’ आढळला 

हे सुद्धा वाचा

प्रत्यक्षात तपासाअंती ही महिला ‘फॉरेन ॲक्सेंट एक्सेंट सिंड्रोम’ने ग्रस्त असल्याचे समोर आले. 39 वर्षीय ॲबीची ही स्थिती खूप दुर्मिळ असून जगभरात या सिंड्रोमची केवळ 100 प्रकरणे दिसतात. मी पुन्हा कधीच सामान्यपणे बोलू शकेन की नाही याबद्दल मला भीती वाटत आहे, असे ॲबी म्हणाली. तसेच माझ्या आवाजाचा पीचही खूप उंच झाला. मी ज्या अनोळखी लोकांशी बोलले, ते तर माझे उच्चार ऐकून हसू लागले. सुरुवातीला मलाही याची गंमत वाटल्यामुळे मी कधीच नाराज नव्हते, पण आता तसे नाही. कधीकधी मला अशी वागणूक दिली जाते की मी अमेरिकन नाही.

2021 मध्ये मिळाली मदत

शस्त्रक्रियेपूर्वी ॲबी एक व्यावसायिक गायक होती. वयाच्या 11 व्या वर्षी तिने गायला सुरुवात केली. 2021 मध्ये तिला खूप मदत मिळाली, असे तिने सांगितले. मसल मेमरी आणि थेरपीच्या मदतीने तिची गाण्याची (आवाजाची पातळी) परत मिळाली. त्यांनी सांगितले की ‘मी एक उत्तम स्पीच पॅथॉलॉजिस्ट कडे गेले, त्यांनी माझ्या आवाजाचा पीच कमी करण्यास मदत केली. यामुळे माझ्या मानेतील नसाही शांत झाल्या, जे इतके चांगले होते की मी माझा बोलण्याचा (नॉर्मल) आवाज परत मिळाला.